आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरदर्शनवर पुन्हा एकदा सुरु होणार शाहरुख खानची मालिका \'सर्कस\', जाणून घ्या तारीख आणि वेळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा किंग खान अर्थातच अभिनेता शाहरुख खानला आज संपूर्ण जग ओळखतं. पण शाहरुखच्या करिअरची सुरुवात नेमकी कशी झाली, याविषयी क्वचितच लोकांना ठाऊक असावं. शाहरुखने त्याच्या अभिनय करिअरचा श्रीगणेशा छोट्या पडद्यावरुन केला होता. करिअरच्या सुरुवातीच्या काळात शाहरुख 'सर्कस' आणि 'फौजी' या मालिकांमध्ये झळकला होता. या दोन्ही मालिका 90 च्या दशकात दुरदर्शन वाहिनीवर प्रसारित झाल्या होत्या. आता 51 वर्षांच्या झालेल्या शाहरुखला त्याचे चाहते पुन्हा एकदा त्याकाळातील रुपात बघू शकणार आहेत. याचे कारण म्हणजे त्याची गाजलेली 'सर्कस' ही मालिका पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. येत्या 19 फेब्रुवारी पासून रात्री 8 वाजता ही मालिका दुरदर्शनवर प्रसारित केली जाणारेय. अजीज मिर्झा आणि कुंदन शाह दिग्दर्शित या मालिकेतील सर्कशीत काम करणा-या लोकांचे भावविश्व रेखाटले होते. 

शोमध्ये शाहरुख खानने शेखर नावाच्या मालाई सर्कसच्या मालकाची व्यक्तिरेखा साकारली होती. शाहरुखसह रेणुका शहाणे, आशुतोष गोवारिकर, रेखा सहाय, मीता वशिष्ठ, पवन मल्होत्रा, नीरज वोरा, हैदर अली या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. ही त्याकाळातील गाजलेली मालिका होती.  एकंदरीतच एवढ्या वर्षांनी पुन्हा एकदा शाहरुखला छोट्या पडद्यावर बघणे त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा वेगळे नसेल. 
बातम्या आणखी आहेत...