आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Reached Salman Khan Home Before Hit And Run Case Hearing

मध्यरात्री सलमानला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचला शाहरूख खान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सलमान खानशी संबंधित बहुचर्चित हिट अँड रन प्रकरणाची सुनावमी आज होणार आहे. सगळ्या देशाचे लक्ष या खटल्याच्या निकालाकडे लागलेले असतानाच मंगळवारी रात्री आणखी एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट घडली. सुनावणीच्या पूर्वी म्हणजे मंगळवारी मध्यरात्री बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खानने सलमानला सपोर्ट करण्याच्या उद्देशाने त्याची भेट घेतली.

शाहरूख सलमानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये त्याला भेटण्यासाठी गेला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरूख खान बराच वेळ सलमानच्या घरी होता. शाहरूखने यावेळी सलमानकडून या संपूर्ण केसबाबात माहिती घेतल्याचेही समजते आहे. यावेळी सलमान खानचा वकील श्रीकांत शिवडेही उपस्थित होते. अर्पिताच्या लग्नानंतर दुसऱ्यांदा बॉलीवूडचे हे दोन दिग्गज एकत्र आढळून आले आहेत.

विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये जर सलमान खान दोषी आढळला तर सलमानला 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो. मुंबईचे सत्र न्यायाधीश डी डबल्यू देशपांडे या प्रकरणावर निकाल देतील. त्यांनी सलमान खानला सकाळी 11.15 वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हायप्रोफाईल प्रकरण असल्याने या निर्णयाच्या सुनावणीनेळी मोठ्याप्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात असणार आहे.

न्यायालयात केवळ वकील, कोर्ट स्टाफ आणि मीडियाच्या प्रतिनिधींनाच उपस्थित राहण्याची परवानगी असेल. या निर्णयाकडे सलमान खानबरोबरच अवघ्या बॉलीवूडचे लक्ष लागून राहिलेले असणार आहे. त्याचे कारण म्हणजे सलमान खानवर सध्या इंडस्ट्रीचे सुमारे 200 कोटी रुपये लागलेले आहेत. त्याच्या आगामी चित्रपटांचे अंदाजे बजेट एवढे आहे.