आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री उशीरा घरी येण्यावरून श्रद्धावर रागावले शक्ती कपूर, म्हणाले वेळेवर घरी येत जा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रद्धा कपूर आणि शक्ती कपूर. - Divya Marathi
श्रद्धा कपूर आणि शक्ती कपूर.
मुंबई - शक्ती कपूर आणि त्यांची पत्नी शिवांगी कपूर मुलगी श्रद्धावर नाराज असल्याचे समोर आले आहे. एका एंटरटेनमेंट पोर्टलने केलेल्या दाव्यानुसार शक्ती आणि शिवांगी यांनी श्रद्धाला कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ द्यायला सांगितले आहे. श्रद्धा सध्या रोज रात्री उशीरा घरी येत असल्याचे समोर आले आहे. ती सायंकाळी शुटिंग उरकते आणि वरचेवर गर्ल गँगबरोबर आऊटिंगला जाते, असे समोर आले आहे.

आई-वडिल रागावले..
पोर्टलच्या रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार श्रद्धा रात्री उशीरा घरी येत असल्याने आई वडिलांनी तिला रागावत वेळेवर घरी येण्यास सांगितले. एवढेच नाही तर आऊटिंग करणे कमी करून कुटुंबाबरोबर जास्त वेळ द्यायलाही सांगितल्याचे समोर आले आहे.

तीन चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यस्त
'ओके जानू' आणि 'रॉक ऑन 2' चे शुटिंग झाल्यानंतर श्रद्धाने नवी दिल्ली आणि न्यू यॉर्कमध्ये 'हाफ गर्लफ्रेंड'चे शुटिंग केले. त्यानंतर ती आता मुंबईत शुटिंग करत आहे. 29 वर्षांच्या श्रद्धाने 'तीन पत्ती' (2010) पासून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर 2011 मध्ये ती 'लव्ह का दी एंड' मध्ये झळकली. 2013 मध्ये 'आशिकी 2' द्वारे तिने बॉलीवूडमध्ये पाय रोवले. 'हैदर', 'एक व्हीलन' आणि 'ABCD 2' सारख्या हिट चित्रपटांही ती झळकली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, कुटुंबीयांबरोबरचे श्रद्धाचे काही PHOTOS...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...