आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेसकडे आहे परिवाराची अब्जावधींची प्रॉपर्टी, पाकिस्तानी व्यक्तीने मागितला हिस्सा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शर्मिला टागोर यांचा 8 डिसेंबरला वाढदिवस आहे. - Divya Marathi
शर्मिला टागोर यांचा 8 डिसेंबरला वाढदिवस आहे.

मुंबई/भोपाळ - बॉलिवूड अॅक्ट्रेस आणि भोपाळमधील अब्जावधींच्या प्रॉपर्टीची मालकीण शर्मिला टागोर यांच्या आज (8 डिसेंबर) वाढदिवस आहे. नवाब पतोडींच्या निधनानंतर त्यांच्या अब्जावधींच्या प्रॉपर्टीची एकमेव मालकीण त्यांची पत्नी शर्मिला टागोर आहे. त्यांची तीन मुलं आहेत, सैफ अली खान, सबा अली खान आणि सोहा अली खान. शर्मिला या त्यांच्या पतीच्या आणि पतोडी परिवाराच्या प्रॉपर्टीचा सांभाळ करतात. पतोडी परिवाराची हरियाणा, दिल्ली आणि भोपाळ रियासतमध्ये अब्जावधींची प्रॉपर्टी आहे. त्यांची मोठी मुलगी सबा अली ऑकाफ-ए-शाही च्या पेंडिंग कामांसाठी नेहमी भोपाळला येत असतात. 

 

5000 कोटींची संपत्तीचा आहे वाद
भोपाळच्या नवाबांच्या या अब्जावधींची प्रॉपर्टीमध्ये काही हवेली, राजवाडे आणि शेकडो एकर जमीन आहे. यातील काही संपत्तीबद्दल कोर्टात वाद सुरु आहे. या वादात एक इंट्रेस्टिंग मोड आला आहे. पाकिस्तानमधील एका व्यक्तीने दावा केला आहे की तो सैफ अली खानचा भाऊ आहे. यामुळे नवाबांच्या या 5000 कोटींच्या प्रॉपर्टीमध्ये त्याचाही बरोबरीचा अधिकार आहे. यामुळे भोपाळचे शेवटचे नवाब हमीदुल्लाह खान यांच्या 5000 कोटींच्या संपत्तीचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

 

पाकिस्तानमधील एका व्यक्तीने केला दावा... 
- भोपाळचे शेवटचे हमीदुल्लाह खान यांच्या संपत्तीचा पहिल्यापासून वाद आहे. ही संपूर्ण संपत्ती शत्रूची संपत्ती असल्याचे म्हटले गेल्याने शर्मिला टागोर आणि सैफ अली खान त्याविरोधात कायदेशीर लढाई लढत आहेत. तर आता पाकिस्तानमधील लाहोर येथील आरिफ मिर्झा याने या संपत्तीमध्ये आपलाही बरोबरीचा अधिकार असल्याचा दावा केला आहे. त्याने जबलपूर हायकोर्टात याचिकाही दाखल केली आहे. 

 

आरिफ मिर्झाने कोर्टाला काय सांगितले... 
- आरिफ मिर्झा याने जबलपूर हायकोर्टात दाखल केलेल्या दाव्यात म्हटले आहे, की भोपाळचे नवाब हमीदुल्लाह खान यांच्या मुलीची धाकटी मुलगी माझी आई आहे. त्याचा दावा आहे की माझी आजी राबिया सुल्तानचा जन्म आणि मृत्यू भोपाळमध्येच झाला आहे. त्याआधारवर या संपत्तीत माझाही अधिकार आहे. 
- सैफ अली खानचे वडील मंसूर अली खान पतोडी यांची आई साजिदा सुल्तान भोपाळचे शेवटचे नवाब हमीदुल्लाह यांची मुलगी होती. मंसूर अली खान यांचा जन्मही भोपाळमध्येच झाला होता. सैफ अली खान आई शर्मिला टागोरचा उत्तराधिकार म्हणून भोपाळमधील नवाब परिवाराची जबाबदारी सांभाळतो. 

 

मोठी मुलगी पाकिस्तानात गेल्यानंतर साजिदा सुल्तान झाल्या वारस 
- नवाब हमीदुल्लाह खान हे भोपाळचे शेवटचे नवाब म्हणून ओळखले जातात. त्यांची मोठी मुलगी आबिदा सुल्तान फाळणीनंतर पाकिस्तानात गेली होती. त्यानंतर नवाब हमीदुल्लाह यांची छोटी मुलगी साजिदा नवाबांच्या संपत्तीची वारस झाली होती. मंसूर अली खान पतोडी हे साजिदा यांचे चिरंजीव होते. 
- तर आरिफ मिर्झाचा दावा आहे, की त्याचा जन्म नागपूरमध्ये झाला आणि शिक्षणही भारतात झाले. तो त्याच्या आईसोबत पाकिस्तानात गेला होता. व्हिसाच्या प्रॉब्लेममुळे तो भारतात परत येऊ शकला नाही. 

 

सैफने आरिफच्या याचिकेला दिले आव्हान 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरिफ मिर्झाच्या दाव्याला शर्मिला टागोर आणि सैफ अली खानने कोर्टात आव्हान दिले आहे. आरिफच्या दाव्याला उत्तर देताना सैफ अली खानने म्हटले आहे, की त्याची आजी साजिदा सुल्तान ही नवाब हमीदुल्लाह खान यांची एकमेव वारस होती. त्यांचा वारस मंसूर अली खान पतोडी होते. त्यामुळे आरिफचे संपत्तीशी काही देणेघेणे नाही. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, शर्मिला टागोर यांची अब्जावधींची संपत्तीचे फोटो...   

बातम्या आणखी आहेत...