आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशी कपूर नव्हते खरे नाव, आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये झळकणारे पहिले भारतीय अभिनेते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेते शशि कपूर यांचे प्रदीर्घ आजारानंतर मुंबईत निधन झाले. याची माहिती मिळताच त्यांचे पुतणे ऋषि कपूर यांनी दिल्लीतील शूटिंग सोडून ते मुंबईल रावाना झाले आहेत. आपल्या विशिष्ट हास्यासाठी शशि कपूर प्रसिद्ध होते. 40च्या दशकात चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या शशि कपूर यांचा जन्म 18 मार्च 1938 ला कोलकात्यात झाला होता.

 

वडील पृथ्वीराज कपूर यांच्यामुळे घरात पहिल्यापासून सिनेमा होताच. त्यासोबत मोठे बंधू राज कपूर यांच्यामुळे चित्रपटाशी त्यांचा संबंध येणार हे ओघानेच आले. 2011 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. 2015 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याआधी त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर यांनाही हा सन्मान मिळाला होता. चित्रपट सृष्टीतील हा महत्त्वाचा सन्मान मिळवणारे कपूर परिवारातील ते तिसरे सदस्य ठरले होते. 

 

शशि कपूर नव्हते खरे नाव... 

शशि कपूर यांचे खरे नाव बलबीर राज कूपर होते. पृथ्वीराज कपूर यांच्या घरात जन्मलेल्या शशि यांनी अभिनयचाचे धडे नसते गिरवले तरच नवल. वडील आणि भावांप्रमाणे शशि यांचे देखील चित्रपट सृष्टीत पदार्पण झाले. 40च्या दशकात त्यांचे रुपेरी पडद्यावर आगमन झाले. 
- मुंबईतील डॉन बॉस्को शाळेत शशि कपूर यांचे प्राथमिक शिक्षण झाले. शाळेच्या सुटीच्या काळात वडील पृथ्वीराज त्यांना स्टेजवर अॅक्टिंग करण्यासाठी प्रोत्साहित करायचे. 
- पुढे मोठे बंधू राज कपूर यांनी त्यांची फिल्म आग (1948) मध्ये शशि यांना रोल दिला. यानंतर 1951 मध्ये राज कपूर यांच्याच 'आवारा'मध्ये शशि दिसले होते. 
आवारामध्ये त्यांनी राज कपूर यांच्या बालपणाचा रोल केला होता. 
- वडिलांच्या सल्ल्याने शशि यांनी गोद्फ्रे कँडल यांचा थिएटर ग्रुप जॉइन केला होता. या ग्रुपसोबत जगभर भ्रमंती करतानाच गोद्फ्रे यांची मुलगी जेनिफरच्या ते प्रेमात पडले. अवघ्या 20व्या वर्षी त्यांनी जेनिफरसोबत लग्न केले होते.  

-  हिंदी चित्रपटांबरोबरच शशी कपूर यांनी दोन इंग्रजी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये भूमिका करणारे शशी कपूर हे पहिले भारतीय अभिनेते ठरले. अनेक अमेरिकन व ब्रिटीश चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या. 

बातम्या आणखी आहेत...