Home »News» Shashi Kapoor Chautha At Prithvi Theater

PICS: शशी कपूर यांची शोकसभा, रेखा, राणी, हेमासोबत या कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

दिव्य मराठी वेब टीम | Dec 08, 2017, 12:20 PM IST

  • हेमा मालिनी, रेखा, राणी मुखर्जी, करिश्मा कपूर

कपूर कुटुंबाच्या वतीने आज (7 डिसेंबर) मुंबईतील पृथ्वी थिएटर येथे दिवंगत अभिनेते शशी कपूर यांच्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. शशी कपूर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक मान्यवर याठिकाणी उपस्थित आहेत. रणधीर कपूर आणि त्यांची पत्नी बबिता, शम्मी कपूर यांच्या पत्नी नीलादेवी, रिमा जैन, शशी कपूर यांची कन्या संजना कपूर, तिचे पती वाल्मिक थापर यांच्यासह हेमा मालिनी, रेखा, राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, राकेश रोशन, जितेेंद्र, गुलजार, सोनी राजदान, जुही बब्बर, प्रेम चोप्रा, डिंपल कपाडिया, कुणाल खेमू, सोहा अली खान, चंकी पांडे, गुलजार, सीमी गरेवाल, वहिदा रहमान, तारा शर्मा या कलाकारांनी आपल्या लाडक्या कलाकाराला श्रद्धांजली वाहिली.

- 4 डिसेंबर रोजी वयाच्या 79 व्या वर्षी शशी साहेबांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
- 5 डिसेंबर रोजी शशी कपूर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.
- 18 मार्च 1938 रोजी कोलकाता येथे त्यांचा जन्म झाला होता. 2011 मध्ये त्यांना पद्मभूषण आणि 2015 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.
- शशी कपूर यांच्या पत्नी जेनिफर यांचे 1984 मध्ये कॅन्सरमुळे निधन झाले होते. पत्नीच्या निधनानंतर शशी कपूर एकटे पडले होते. त्यांनी सिनेसृष्टीपासून फारकत घ्यायला सुरुवात केली होती. या दाम्पत्याला कुणाल, करण आणि संजना ही तीन मुले आहेत.


पुढील स्लाईड्सवर बघा, पृथ्वी थिएटरमध्ये पोहोचलेल्या कलाकारांची छायाचित्रे...

Next Article

Recommended