Home »News» Shashi Kapoor Last Photo Before Funeral: Amitabh Bachchan-Shahrukh And Other Celebs Reached

शशी कपूर यांचा अखेरचा फोटो, आजारपणामुळे दिवसेंदिवस ढासळत गेली होती तब्येत

RJ ALOK | Dec 28, 2017, 11:45 AM IST

मुंबई. ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर अनंतात विलीन झाले आहेत. सोमवारी मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ काळापासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. 5 डिसेंबर रोजी मुंबईतील सांताक्रूज स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा अंत्यसंस्कारापूर्वीचा अखेरचे छायाचित्र समोर आले. आजारपणामुळे शशी कपूर यांची तब्येत अतिशय खालावली होती, हे या छायाचित्रावरुन दिसून येत आहे. शशी कपूर यांचा मुलगा करण कपूर यूएसला स्थायिक आहे. आज तो सकाळी भारतात परतल्यानंतर दुपारी साडे बाराच्या सुमारास शासकीय इतमामात शशी कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शशी कपूर अनंतात विलीन, शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार, दिग्गजांनी दिला अखेरचा निरोप

शशी साहेबांना अंतिम निरोप देण्यासाठी अमिताभ बच्चन, अभिषेक, रणबीर, करीना, सैफ, बोनी कपूर, ऋषी कपूर, राणी मुखर्जी, लारा दत्ता, रंजीत, प्रेम चोप्रा, सलीम खान, मुकेश ऋषी यांच्यासह अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते.


पोलिसांनी दिली सलामी...
- 2011 मध्ये शशी कपूर यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
- पद्मभूषण शशी कपूर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
- यावेळी पोलिसांनी गन फायर करुन त्यांना सलामी दिली.


पुढील स्लाईड्सवर बघा, शशी कपूर यांना अखेरचा निरोप देतानाची छायाचित्रे...

Next Article

Recommended