आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंडली पाहून ज्योतिषाने म्हटले होते- याला आहे राजयोग, नोकरचाकरही विमानातून फिरतील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमधील एकेकाळचे स्टार आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा आज (9 डिसेंबर) वाढदिवस आहे. चित्रपट कारकिर्द गाजवल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी राजकारणाकडे मोर्चा वळवला. राजकारणातही ते यशस्वी राहिले. त्यांचा हा भविष्यकाळ एका ज्योतिषाने काही दशके आधीच वर्तवला होता. पाटण्यातील प्रसिद्ध ज्योतिष पंडित विष्णूकांत शास्त्रींनी शत्रुघ्न सिन्हा यांची कुंडली पाहून म्हटले होते, की या मुलाच्या आयुष्यात राजयोग आहे. 

 

कोणते भविष्य वर्तवले होते पंडित शास्त्रींनी... 
- शत्रुघ्न सिन्हा यांनीच हा किस्सा एकदा सार्वजनिक केला होता. शत्रुघ्न सिन्हा यांचे म्हणाले होते, 'मी माझ्या वडिलांसह पंडितजींकडे गेलो होतो. त्यांनी कुंडली आणि हात पाहिल्यावर म्हटले होते की, हा खूप मोठा माणूस होईल. याचे नोकरचाकरसुद्धा विमानातून प्रवास करतील.' पंडित विष्णुकांतजी यांच्या भाकितावर त्या वेळी शत्रुघ्न सिन्हा यांना राग आला होता.
- शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले की, 'त्या वेळी मी खूप लहान होतो. माझे वडील बी.पी.सिंह आम्हा चारही भावांना घेऊन पंडितजींच्या घरी गेले होते. त्यांनी माझा हात पाहून म्हटले होते की, याच्या दहाही बोटांमध्ये शंख आहे. याचा तर राजयोग आहे, हा खूप पैसा कमावणार आणि याचे नावही खूप मोठे होईल.' 
- शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, त्यावेळी मला वाटले पंडितजी आपली चेष्टा करत आहेत. त्यामुळे मला तेव्हा त्यांच्या बोलण्याचे खूप वाईट वाटले होते. 

 

शत्रुघ्न सिन्हा यांना बिहारचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा 
- राजकारणात प्रवेश केल्यानंतर प्रत्येक शत्रुघ्न सिन्हा यांची राज्यसभेवर निवड झाली. राज्यसभा खासदार असताना अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री देखील होते. जानेवारी 2003 ते ऑगस्ट 2004 या काळात ते मंत्री होते.
- यानंतर 2009 ला 15व्या लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाले आणि लोकसभेत गेले. 2009 ते 2014 आणि 2014 मध्ये ते पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून गेले आहेत. यावेळी केंद्रात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार असल्यामुळे मंत्रीपदाची त्यांना आपेक्षा होती. 
- बिहारची राजधानी पाटण्यात जन्मलेल्या सिन्हा यांना2015 ;च्या अखेरीस झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करावा अशी इच्छा होती, मात्र तीही अपूर्ण राहिली. त्यानंतर अनेकदा त्यांनी पक्षाला आरसा दाखवण्याचे काम केले आहे. 
- मात्र पंडित विष्णूपंत शास्त्रींनी सांगितलेले भविष्य शत्रुघ्न सिन्हा यांनी खरे करुन दाखवले आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोण होते पंडित विष्णूकांत शास्त्री... 

बातम्या आणखी आहेत...