आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'पद्मावती\': शत्रुघ्न सिन्हांनी विरोधकांना म्हटले गुंड, PM मोदींच्या मौनावर उपस्थित केला सवाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'पद्मावती' चित्रपटाला होत असलेल्या विरोधावरुन भारतीय जनता पक्षाचे नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच निशाणा साधला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना 'गुंड' म्हटले असून पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवरही प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. सिन्हा म्हणाले, 'जेव्हा गुंड धमक्या देत आहेत, तेव्हा हायकमांड शांत कसे राहू शकतात?' 'पद्मावती' चित्रपटाला सर्वात पहिला विरोध हा भाजपशासित राजस्थानमधून झाला आहे. त्यानंतर काही भाजप नेत्यांनी उघड-उघड या विरोधाचे समर्थन केले तर चित्रपट प्रदर्शनालाही विरोध केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर पंतप्रधानांचे अजून वक्तव्य आलेले नाही. 

 

बोलता-बोलता अमिताभ बच्चनरही निशाणा 
-  शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, 'मी बच्चन साहेबांचे मौन समजू शकतो. ते नेहमी वादापासून दूर राहातात. मात्र इतरांचे काय, इंडस्ट्रीमध्ये एवढा सन्नाटा का आहे?'
- यावेळी  शत्रुघ्न सिन्हा सुरुवातीला पंतप्रधानांवर कमेंट करताना म्हणाले, 'एका मर्यादेपर्यंत मी भाजपमधील माझ्या सहकाऱ्यांचे शांत राहाणे समजू शकतो. कारण जेव्हा गुंडाना मोकळे सोडले असताना ते काय करु शकतात.'
- पंतप्रधानांचे नाव घेऊन सिन्हा म्हणाले, 'मी हेही सांगू इच्छितो की आपले पंतप्रधान आणि दुसरे हायकमांड या प्रकरणावर फार वेळ शांत राहिले आहेत.'
- 'पद्मावतीचा वाद चिघळत चालला आहे, गुंड भन्साळी आणि दीपिका पदुकोनला धमकी देत आहेत, अशावेळी हायकमांड शांत कसे राहु शकतात? अशावेळी आमच्या पंतप्रधानांनी म्हटले पाहिजे की आता खूप झाले, शांत राहा.'
- 'तुम्ही जर गुंडांना असे मोकळे सोडणार असाल तर ते काहीही करु शकतात आणि यापुढे कधीही कंट्रोलमध्ये येणार नाहीत.'  

बातम्या आणखी आहेत...