आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shatrughan Sinha Talked About His Black Colour And Bollywood Struggle

सावळ्या रंगामुळे तुटले होते या अॅक्टरचे लग्न, नंतर झाला सुपरस्टार, वाचा सक्सेस स्टोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी पूनम आणि मुलगी सोनाक्षीसोबत शत्रुघ्न सिन्हा. - Divya Marathi
पत्नी पूनम आणि मुलगी सोनाक्षीसोबत शत्रुघ्न सिन्हा.
जयपूर (राजस्थान)- बॉलिवूड अॅक्टर आणि नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘एनी थिंग बट खामोश’ या बायोपिकवर चर्चा केली. यावेळी त्यांनी खासगी जीवनाशी निगडित अनेक रोचक किस्से सांगितले. सावळ्या रंगामुळे माझे लग्न कसे तुटले होते, याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रभा खेतान फाऊंडेशन आणि स्याही यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वाचा लग्न तोडताना मुलीकडच्या लोकांनी शत्रुघ्न यांच्या सावळ्या रंगावर काय म्हटले होते...

- शत्रुघ्न यांनी सांगितले, की पाटण्यासारख्या लहान शहरात मी राहत होतो. लोक माझ्या आईवडीलांना म्हणायचे, की तुमचा मुलगी तर सावळा आहे. आमची मुलगी गोरी आहे. दोघांचा एकत्र जरी फोटो घेतला तर तो ब्लॅक अॅण्ड व्हाईटच येईल.
- एखाद्या तरुणाबाबत जर समाजाचे असे मत असेल तर तो बॉलिवूडमध्ये हिरो कसा होऊ शकतो.
- चर्चेच्या वेळी शत्रुघ्न यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत असलेली मैत्री कशी तुटली हेही सांगितले.
कॉलेजच्या क्लास बोर्डवर नव्हे तर नोटीस बोर्डवर दिसायचे शॉटगन
- शत्रुघ्न यांचे तीन भाऊ डॉक्टर होते. मी डॉक्टर व्हावे यासाठी आईवडीलांनी खुप प्रयत्न केले. पण कम्पाऊंडर होण्याचीही माझी योग्यता नव्हती.
- कोणत्याही मेडिकल कॉलेजमध्ये मला अॅडमिशन मिळाली नाही. आणि मिळणार तर कशी, कॉलेजच्या क्लास बोर्डवर नव्हे तर मी कायम नोटीस बोर्डवर दिसायचो.
- पण मला आलेल्या अपयशांनी मी खचून गेलो नाही. हिरो होण्याचा विचार मनात होताच. मुंबईत गेलो. लोकांनी सहानुभूती दाखवली. हिरो नव्हे तर किमान व्हिलनचा तरी रोल मिळेल असे सांगितले.
- पण सांगायचे, प्रेम चोपडा होण्याचा प्रयत्न करु नकोस ते हॅंडसम आहेत. प्राण होण्याचा तर विचारही डोक्यातून काढून टाक. तू जोगेंदर होऊ शकतोस.
- मला वाटले, की बॉलिवूडमध्ये अजून असा हिरो आला नाही जो दिसायला सावळा असेल आणि ज्याला मिशा असतील. मीही हो म्हटले. सुरवात झाली.
पुढील स्लाईडवर वाचा... आईबद्दल काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा... राजेश खन्नाशी मैत्री तुटण्याची काय दिली कारणे... आजूनही त्यांना कोणत्या गोष्टीची आहे मनात सल.... अमिताभबद्दल काय म्हणाले शॉटगन....