आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिल्पा शेट्टीचे वडील अनंतात विलीन, अंत्यसंस्कारात पोहोचले अक्षय-अभिषेकसह अनेक कलाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे वडील सुरेंद्र शेट्टी (74) यांचे मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी सकाळी जुहूस्थित स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अक्षय कुमार, अभिषेक बच्चनसह अनेक बॉलिवूड कलाकार अंत्य यात्रेत सहभागी झाले होते.

वयाच्या 74 वर्षातही घेत होते स्वत:ची काळजी...

शिल्पाचे वडील सुरेंद्रनाथ शेट्टी हे औषधीचे वॉटर प्रूफ कव्हर बनवणार्‍या कंपनीचे मालक होते. शिल्पा गेल्या काही महिन्यांपासून वडिलांच्या प्रकृतीची काळजी घेत होती. 'वर्ल्ड हार्ट डे'च्या निमित्ताने शिल्पाने वडिलांच्या प्रकृतीची माहिती देताना सांगितले होते, ''वयाच्या 74 व्या वर्षीही तिचे वडील नियमित चालत फिरत होते. स्वत:च्या प्रकृतीची स्वत: काळजी घेत होते. त्यांना कोणताही आजार नव्हता. पण, काही वर्षांपूर्वी त्यांना लकवा झाला होता.''

पुढील स्लाईड्समध्ये बघा, शिल्पाच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारात पोहोचले बॉलिवूड कलाकार...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...