आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shilpa Shinde, Famously Known As Angoori Bhabhi, Is Facing A Ban.

\'अंगूरी भाभी\'ने बंदीविरोधात पोलिसात केली तक्रार, प्रोड्यूसरवर केले हे आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘भाभीजी घर पर है’ मधील अंगुरी भाभी उर्फ शिल्पा शिंदे हिने सिने अँड टीव्ही आर्टिस्ट
असोसिएशन (सिन्टा) विरोधात मुंबईतील बंगुरनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत तिने काही आरोप केले आहेत.

शिल्‍पाने मालिका मध्येच सोडल्याच्या कारणामुळे सिन्टा शिल्पा शिंदेवर आजीवन बंदी घालण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. पण मला काम करण्यापासून रोखण्याचा अधिकार सिन्टाला नाही, असे शिल्पा शिंदेंने तक्रार दाखल करण्यापूर्वी म्हटले. आपल्‍याला निर्मात्‍यांकडून सातत्याने त्रास होत असल्‍याचा आरोपही शिल्‍पाने केला आहे.
कसा सुरु झाला वाद?
- 'भाभीजी घर पर है' मालिकेची सुरुवात 2 मार्च 2015ला झाली होती. या शोमुळे शिल्पाला लोकप्रियता मिळाली.
- काही महिन्यांपासून तिचा शोची निर्माता आणि टीमसोबत मानधनावरून वाद सुरु होता.
- शिल्पाचे मानधन दोनवेळा वाढवण्यात आले होते, अशाही बातम्या आल्या होत्या. तरीदेखील ती नाराज होती.
- शिल्पाला दुस-या चॅनल्ससोबत काम करायचे होते, मात्र तिला अडवण्यात येत होते.
'द कपिल शर्मा शो' ची क्रिएटिव्‍ह डायरेक्टर काय म्‍हणाली....
'द कपिल शर्मा शो' ची क्रिएटिव्‍ह डायरेक्टर प्रीती सिमोनने म्‍हटले, ''आम्‍ही शिल्पासोबत शुटिंग करत नाही. हा वाद संपल्‍यानंतरच आम्‍ही आमच्‍या शोमध्‍ये तिचे स्‍वागत करणार आहोत.'' मात्र, शिल्‍पाचे म्‍हणने आहे की, ती कपिलच्‍या शोमध्‍ये काम करणार नाही.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, शिल्‍पा काय म्‍हणाली....