आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलीज झाला \'शिवाय\'चा ट्रेलर, अॅक्शन सीन करताना दिसला अजय देवगण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'शिवाय'च्या पोस्टरवर एरिका कार आणि अजय देवगण - Divya Marathi
'शिवाय'च्या पोस्टरवर एरिका कार आणि अजय देवगण
इंदोर: अजय देवगण स्टारर \'शिवाय\' या आगामी सिनेमाचा ट्रेलर रविवारी (7 ऑगस्ट) इंदोरमध्ये लाँच करण्यात आला. बास्केटबॉल कॉम्पेल्स, रेस कोर्स रोडवर झालेल्या लाँचिंग इव्हेंटमध्ये अजयसोबत सिनेमातील अभिनेत्री सायशा सहगल आणि एरिका कारसुध्दा उपस्थित होत्या. \'यू मी और हम\' सिनेमानंतर हे अजय देवगणने दिग्दर्शनात केलेला दुसरा सिनेमा आहे. हा सिनेमा अजय देवगण फिल्म्स अंतर्गत बनवण्यात आला आहे. 
 
सिनेमात हे स्टार्सही दिसतील...
अजय देवगण, सायशा आणि एरिकाशिवाय अली काजमी आणि वीर दाससुध्दा सिनेमात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे 28 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. ट्रेलरमध्ये अजय देवगण अॅक्शन करताना दिसणार असून बॅकग्राऊंडमध्ये शिव स्तुती आणि ट्रेलरमध्ये कलाकारांच्या तोंडून एकही डायलॉग्स ऐकायला मिळत नाही. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ट्रेलमधून अजय, सायशा आणि एरिका घेतलेले फोटो...
 
बातम्या आणखी आहेत...