आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • SHOCKING Revelations Made By Sanjay Dutt About His Jail Term At A Media Conclave

\'तुरुंगात मी जे खाल्ले, ते गाढवसुद्धा खाणार नाही\', संजयने सांगितले गजाआडचे दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर एका पत्रकार परिषदेत संजय दत्त - Divya Marathi
तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर एका पत्रकार परिषदेत संजय दत्त
मुंबईः अभिनेता संजय दत्त यावर्षी २५ फेब्रुवारी रोजी कायमचा तुरुंगाबाहेर आला आहे. जवळजवळ तीन वर्षे तुरुंगात काढणा-या संजयने शुक्रवारी एका कार्यक्रमात तुरुंगातील आणि खासगी आयुष्यातील अनेक अचंबित करणा-या गोष्टींचा उलगडा केला. 'तुरुंगात मी जे अन्न खाल्ले ते गाढवसुद्धा खाऊ शकणार नाहीत', असे संजयने यावेळी सांगितले. बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजयने तुरुंगवास भोगला आहे.
तुरुंगात दररोज रडून व्हायची दिवसाची सुरुवात...
- संजय दत्तने सांगितली, ''सिक्युरिटीच्या कारणामुळे मला तुरुंगात एकटे ठेवण्यात आले होते. तेथे रोज सकाळी सहा वाजता मी उठायचो आणि कुटुंबीयांच्या आठवणीत रडायचो.''
- ''वर्कआउटनंतर अंघोळ करायचो आणि शिव पुराण, गणेश पुराण, महाभारत, भगवतगीता आणि रामायणाचा पाठ करायचो. म्हणजेच तेथे मी पंडितच झालो होतो.''
- ''वर्षभर मी तेथे केवळ चना डाळ खाल्ली. तेथे मला जेवणात राजगिराची भाजी मिळायची. या भाजीचे नावे मी तुरुंगातच पहिल्यांदा ऐकले होते. ती भाजी तुम्ही बकरी, बैल किंवा गाढवाला दिली तरी ते खाणार नाहीत.''
- ''फिट राहण्यासाठी मी दररोज दोन तास धावायचो. बादल्यांमध्ये पाणी भरुन ते झाडांना घालायचो. पोट कमी करण्यासाठीसुद्धा मी व्यायाम केला.''
- ''तुरुंगात गेलो तेव्हा माझे वजन १०० किलो होते आणि जेव्हा मी तुरुंगाबाहेर पडलो, तेव्हा ४० किलो वजन कमी केले आहे.''
- ''तुरुंगात मला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली, ही गोष्ट खोटी आहे. इतर कैद्यांच्या तुलनेत माझ्यासोबत अतिशय वाईट व्यवहार केलाय जायचा. जणू मी इंग्रजांच्या काळात जगतोय, असे मला वाटायचे.''
- ''मी माझ्या वडिलांना ड्रग्स घेत असल्याची गोष्ट सांगितली होती. त्यानंतर मला ट्रीटमेंटसाठी यूएसला पाठवण्यात आले होते. त्या गोष्टीला आता ४० वर्षांचा काळ लोटला आहे. मी आता ड्रग्सकडे वळूनही पाहिलेले नाही. मी माझ्या पालकांना खूप दुःख दिले आहेत, मात्र आता मी चांगला माणूस बनलोय.''
- ''अंडरवर्ल्डच्या लोकांशी बोलण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता. स्वबळावर काहीतरी करुन दाखवावे, असे प्रत्येकाला वाटत असते, तो दबाव माझ्यावरसुद्धा होता.''
पुढे वाचा, तुरुंगात शायर बनला संजय दत्त...
बातम्या आणखी आहेत...