आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Sholay' Completes 40 Years: Amjad Khan And Sanjeev Kumar Has Died, Including Othres 7 Actors

'Sholay' Completes 40 Years: 'शोले'मधील हे 9 कलाकार आता या जगात नाहीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय सिनेसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेला 'शोले' सिनेमाच्या रिलीजला 15 ऑगस्ट रोजी 40 वर्षे पूर्ण होत आहेत. 15 ऑगस्ट 1975 रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता. याचवर्षी एप्रिल महिन्यात हा सिनेमा पाकिस्तानमध्येही रिलीज झाला. या सिनेमात गब्बर, ठाकूर या अविस्मरणीय भूमिका वठवणारे कलाकार आता या जगात नाही. यांच्यासोबतच रहिम चाचा, सांभा या भूमिका वठवणा-या कलाकारांनी काही वर्षांपूर्वी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
'शोले'ला 40 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने divyamarathi.com तुम्हाला सिनेमातील अशा काही कलाकारांविषयी सांगत आहे, ज्यांनी या जगाला अलविदा म्हटले आहे.
अमजद खान -
'शोले' सिनेमातील गब्बर सिंहचे पात्र साकारून इतिहास रचणारे अमजद खान आज आपल्यात नाहीये. त्यांनी 27 जुलै 1992 रोजी या जगाला निरोप घेतला. गब्बर सिंहची भूमिका साकारल्यानंतर अमजद खान या सिनेमानंतर खूप चर्चेत आले. त्यांनी म्हटलेले संवाद आजही लोकांच्या तोंडून ऐकायला मिळतात. त्याकाळी गावा-गावात आणि शहरा-शहरात गब्बरच्याच नावाच्या चर्चा होत्या. खांद्यावर काडतूसाची पेटी अडकवून तंबाखू खाण्याचा अनोखा अंदाज, भयावह रुपात हसणे, आपल्या गँगमधील लोकांना प्रश्न-उत्तर आणि नंतर शिवीगाळ, या अदांनी गब्बर चांगलाच लोकांच्या लक्षात राहिला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, 'शोले'च्या आणखी काही स्टार्सविषयी...