पटियाला - सध्या बॉलिवूड अॅक्ट्रेस आलिया भट्ट पंजाबमध्ये शुटिंग करत आहे. तिच्या एका चित्रपटाचे शुटिंग सध्या पंजाबच्या काही शहरांमध्ये होत आहे. विशेषतः पटियालाच्या अनेक भागांत चित्रपटाचे शुटिंग केले जात आहे. दोन तीन दिवसांपूर्वी ती पंजाबच्या मलेरकोटलामध्येही शुटिंगसाठी गेली होती. पण रविवारी शुटिंगदरम्यान भलतेच घडले. रविवारी पटियालाच्या बारादरी बागमधून गाडीत जाणाऱ्या आलिया भट्टची पर्स एका व्यक्तीने हिसकावली. विशेष म्हणजे हे काम चेन स्नॅचरचे नव्हते तर राजी चित्रपटाच्या सेटवर काम करणाऱ्या एका ज्युनियर आर्टिस्टचे होते.
अशी घडली घटना..
- पटियालाच्या सर्किट हाऊसमध्ये पार्टीचा सीन शूट केल्यानंतर आलियाला गाडीत बसून परतत होती.
- या सीनमदरम्यान तिला रस्त्यात एका व्यक्तीला पैसे द्यायचे होते. पण हा व्यक्ती आलियाची पर्स घेून फरार झाला.
- आलिया गाडीतून उतरली आणि तिही त्याच्या मागे पळाली. पण तेवढ्यात डायरेक्टर कट म्हणाला, आणि सीन संपला.
- शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत याठिकाणी शुटिंग सुरू होते.
- रविवारी दिवसभर आराम केल्यानंतर सायंकाळी ती चंदिगडला रवाना झाली.
कश्मिरी तरुणीची गोष्ट..
- डायरेक्टर मेघना गुलजारच्या या चित्रपटात आलिया भट्ट आणि विक्की कौशल एकत्र झळकणार आहेत.
- एका कश्मिरी तरुणीवर आधारित असी ही गोष्ट आहे. पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याबरोबर तिचे लग्न होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित PHOTOS...