आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 वर्षांनी एकत्र झळकणार अमिताभ आणि ऋषी कपूर, '102 नॉट आऊट' चे झाले पॅकअप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - महानायक अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर या जोडीच्या '102 नॉट आऊट' चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाले आहे. स्वतः अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे ही जोडी तब्बल 26 वर्षांनंतर पुन्हा सिल्व्हर स्क्रिनवर एकत्र झळकणार आहे. 

गुजराती लेखिका-दिग्दर्शिका सौम्या जोशी यांच्या ‘102 नॉट आऊट’ या नाटकावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन चक्क ऋषी कपूर यांच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. 102 वर्षांच्या वृद्धाच्या भूमिकेत अमिताभ तर ऋषी कपूर 75 वर्षीय वृद्धाची भूमिकेत असतील. वडील-मुलामधील प्रेमळ आणि खोडकर नाते यातून उलगडण्यात येणार आहे. उमेश शुक्ला सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. 
 
अमिताभ आणि ऋषी कपूर यांनी यापूर्वी ‘अमर अकबर अँथनी’, ‘अजूबा’ आणि ‘नसीब’ यांसारख्या हिट सिनेमात एकत्र काम केले आहे. या जोडीला आता एवढ्या वर्षांनी वेगळ्या रुपात बघायला त्यांचे चाहते नक्कीच आतुर आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या चित्रपटाच्या सेटवरील आणि अमिताभ तसेच ऋषी कपूर यांच्या लूकचे काही PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...