आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aye Dil Hai Mushkil's Shooting Start, Ranbir Anushka Karan Share Photos

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लंडनमध्ये सुरु झाले ‘ऐ दिल है मुश्किल’चे शूटिंग, रणबीर-अनुष्काने शेअर केले फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रणबीर कपूर आणि करण जोबरने शेअर केला PHOTO)
मुंबई- दिग्दर्शक करण जोहरने लंडनमध्ये 'ऐ दिल है मुश्किल' या आगामी सिनेमाचे शूटिंग सुरु केले आहे. याची माहिती करणने आपल्या टि्वटर अकाउंटवर दिली आहे. तसेच त्याने सिनेमाचे मुख्य कलाकार रणबीर कपूर आणि अनुष्का शर्माचा एक फोटो शेअर करून लिहिले, 'You can never meet with the demands of the heart....our journey begins today...'
या फोटोमध्ये रणबीर आणि अनुष्का क्लॅपबोर्डमागे चेहरा झाकत आहेत. सिनेमाचा नायक रणबीरनेसुध्दा हा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
शिवाय सिनेमाची नायिका अनुष्का शर्माने आपल्या टि्वटर अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहे. तिने चाहत्यांना या सिनेमासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे. तिने लिहिले, 'आज लंडनमध्ये 'ऐक दिल है मुश्किल'चे शूटिंग सुरु केले. या भूमिकेसाठी उत्साही आहे. मला तुमचे प्रेम आणि शुभेच्छा द्या.'
या सिनेमात रणबीर आणि अनुष्काशिवाय ऐश्वर्या राय बच्चनसुध्दा महत्वाच्या भूमिकेत आहेत. मात्र ऐश्वर्याने अद्याप सिनेमाचे शूटिंग सुरु केले नाहीये. कारण सध्या ती 'जज्बा' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.
या सिनेमाच्या माध्यमातून करण तीन वर्षांनंतर दिग्दर्शनात पुनरागमन करत आहे. हा सिनेमा पुढील वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा स्टार्सनी टि्वट केलेले PHOTOS...