आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'धोनी द अनटोल्ड स्टोरी\'मध्ये झळकणार \'बिबी का मकबरा\', चित्रपटात असे दिसेल औरंगाबाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धोनी हे क्रिकेट जगतातील एक मोठे नाव बनले आहे. त्यामुळेच धोनीच्या जीवनावर येणाऱ्या आगामी चित्रपटाविषयीदेखिल भरपूर चर्चा सुरू झाली आहे. धोनीच्या जीवनाविषयी जेव्हा केव्हा उल्लेख केला जाईल तेव्हा त्यामध्ये औरंगाबादचा उल्लेखही होणार हे स्पष्ट आहे. त्याचे कारण म्हणजे, धोनीची पत्नी साक्षी आणि धोनी हे विवाहापूर्वी जेव्हा प्रियकर प्रेयसी होते तेव्हा धोनी खास साक्षीला भेटण्यासाठी औरंगाबादला आला होता. साक्षी औरंगाबादेत हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होती. त्यावेळी धोनी साक्षीबरोबर औरंगाबादच्या रस्त्यांवरून रिक्षामध्ये फिरला होता.

धोनीच्या जीवनातील या आठवणी त्याच्या जीवनावर आधारित आगामी चित्रपटातही दाखवण्यात आल्या आहेत. नुकतेच या चित्रपटातील जब तक हे गाणे रिलीज झाले आहे. यामध्ये धोनीची भूमिका करणारा सुशांतसिंह राजपूत आणि साक्षीची भूमिका करणारी दिशा यांचे बीबी का मकबऱ्यात शूट झालेले काही सीन आहेत. तसेच विद्यापीठ परिसरातील लेणी आणि टेकडीवरही काही दृष्ये चित्रित केली आहेत. चला तर मग पाहुयात या चित्रपटात कसे दिसते औरंगाबाद.
पुढील स्लाइड्सवर पाहा, धोनीच्या चित्रपटात असलेल्या गाण्यातील काही Screenshots यात औरंगाबादेत चित्रित झालेला भाग पाहायला मिळेल.. अखेरच्या स्लाइडवर पाहा गाण्याचा Video..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...