आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टायगरच्या 'बागी'मध्ये श्रद्धा कपूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ)

निर्माता साजिद नाडियाडवालाच्या बॅनरच्या आगामी 'बागी' चित्रपटाद्वारे 'हीरोपंती'ची अभिनेता-दिग्दर्शक जोडी पुन्हा सोबत दिसणार आहे. शूटिंगला लवकरच सुरुवात करण्यात येणार असून टायगर श्रॉफची यामध्ये प्रमुख भूमिका आहे. सब्बीर खान यांचे दिग्दर्शन असलेल्या 'बागी'मध्ये आता फीमेल लीडसाठी श्रद्धा कपूरच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
'आशिकी- 2'नंतर श्रद्धा कपूरचा 'एक विलेन'देखील हिट ठरला. शिवाय शाहिदसोबतच्या 'हैदर'ची देखील बरीच प्रशंसा झाली. वरुण धवनसोबतचा 'एबीसीडी- 2' देखील लवकरच प्रदर्शित होत आहे. नाडियाडवालाच्या बॅनरचा आणि यूटीव्हीचा 'बागी'ही तिच्या करिअरमधील आणखी एक मोठा चित्रपट ठरू शकतो.
प्रेमकथेवर आधारित असलेला हा चित्रपट पुढील वर्षी 15 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी हा अॅक्शन चित्रपट सलमान खान- नगमा अभिनीत 'बागी'चा रिमेक असल्याची इंडस्ट्रीत चर्चा होती. यावर सब्बीर खाननी स्पष्टीकरण देताना हा रिमेक चित्रपट नसल्याचे सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला. दोन प्रियकरांच्या कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटामधील लीड जोडीवर आमच्या पूर्ण टीमचा विश्वास असल्याचे नाडियाडवालाने सांगितले.
''टायगर अाणि श्रद्धा दाेघेही उत्कृष्ट कलाकार असून या चित्रपटासाठी दाेघेही परफेक्ट अाहेत. मी नेहमीच युवा कलाकारांना संधी दिली.'' - साजिद नाडियाडवाला
बातम्या आणखी आहेत...