आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेमस ब्युटी सोपची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर झाली 'हसीना' श्रद्धा कपूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची अष्टपैलू आणि सौंदर्यवती अभिनेत्री श्रद्धा कपूर आता डायना सौंदर्य साबणाची नवीन ब्रॅण्ड अॅम्बेसेडर झाली आहे. डायना साबण आता नवीन आकर्षक पॅकमध्ये येणार असून यात सहा नवीन प्रकार लाँच करण्यात आले आहेत. या नवीन बदलाची घोषणा करण्यासाठी डायनाकडून श्रद्धा कपूरची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. 

याविषयी श्रद्धा म्हणाली, की डायना ब्युटी सोपसोबत जोडल्या गेल्याचा मला आनंद आहे. आपल्याला अनेक संधी मिळतात पण पहिल्याच भेटीत प्रभावित करुन त्या संधीचे सोने करणे आपल्या हातात असते. हे करण्यासाठी आपल्या त्वचेची काळजी घेणे हे त्यासाठीचे पहिले पाऊल ठरते. डायना ब्युटी सोप आपल्या त्वचेला भरपूर पोषण देतो आणि दीर्घकाळ टिकणारा उजळपणा आणि तजेला देतो. 
 
श्रद्धा कपूर लवकरच 'हसीना पारकर' या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...