आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'हसीना: द क्वीन ऑफ मुंबई\'चे नवीन पोस्टर रिलीज, चार मुलांची आई झाली श्रद्धा कपूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हसीना: द क्वीन ऑफ मुंबई' या आगामी चित्रपटातून अभिनेत्री श्रद्धा कपूर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुख्य म्हणजे दाऊदची बहिण साकारताना श्रद्धा या चित्रपटात चार मुलांच्या आईच्या भूमिकेतही दिसणार आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये श्रद्धा तिचा ऑनस्क्रिन पती अंकुर भाटिया आणि चार मुलांसोबत दिसतेय. या फोटोत श्रद्धाचा इनोसंट आणि सिंपल लूक लक्ष वेधून घेतोय. पण यापूर्वी रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये श्रद्धाच्या डोळ्यांत गडद सुरमा, सुरम्याच्या त्या रंगातूनही समोरच्याला घाबरवणारी भेदक नजर पाहायला मिळाली होती. 

श्रद्धाने घेतली आहे बरीच मेहनत... 
या चित्रपटात श्रद्धाच्या पतीच्या म्हणजेच इब्राहिमच्या भूमिकेत अभिनेता अंकुर भाटिया झळकणार आहे. अंकुर आणि श्रद्धाचं नातं पडद्यावर अगदी प्रभावी वाटावं यासाठी त्यांना सेटवर लवकर बोलवण्यात यायचं आणि त्यांच्या ऑनस्क्रीन मुलांसोबत वेळ दिला जायचा. जेणेकरुन चित्रीकरणावेळी हवे तसे दृश्य टिपण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे चित्रपटाचे दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. 
 
18 ऑगस्टला प्रदर्शित होणार चित्रपट..
एका बहिणीपासून सुरु झालेल्या हसीनाचा प्रवास ‘गॉडमदर’ आणि ‘गँगस्टर’पर्यंत येऊन कधी थांबला याचं प्रभावी चित्रण ‘हसीना…’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. येत्या 18 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 
 
पुढील स्लाईड्सवर बघा, यापूर्वी रिलीज झालेले चित्रपटाचे पोस्टर आणि टीजरचा व्हिडिओ..