आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shraddha Kapoor\'s Grand Father Pandharinath Kolhapure Prayer Meet.

अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या आजोबांचे निधन, शोेकसभेत कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून -  तब्बू, पद्मिनी कोल्हापुरे, श्रद्धा कपूर, जया बच्चन - Divya Marathi
डावीकडून - तब्बू, पद्मिनी कोल्हापुरे, श्रद्धा कपूर, जया बच्चन

मुंबई : ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि प्रसिद्ध वीणावादक पं. पंढरीनाथ कोल्हापुरे यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांच्या मुली अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे-शर्मा, शिवांगी कपूर, तेजस्विनी सारस्वत, जावई शक्ती कपूर, प्रदीप शर्मा, पंकज सारस्वत आणि नातवंडे असा परिवार आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर त्यांची नात आहे.
मंगळवारी त्यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. जया बच्चन, तब्बू, सिद्धार्थ रॉय कपूर, पद्मिनी कोल्हापुरे, तेजस्विनी कोल्हापुरे, श्रद्धा कपूर, बोनी कपूर, अमर सिंह, सुधीर मिश्रा, सिद्धांत कपूर, के.के.मेनन, डेविड धवन, पूनम ढिल्लनसह अनेक कलाकारांनी पं. पंढरीनाथ कोल्हापुरे यांना श्रद्धांजली वाहिली.
पं. पंढरीनाथ कोल्हापुरे यांचा अल्पपरिचय
पंढरपूर येथे 1930 साली पं. पंढरीनाथ कोल्हापुरे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पंडित कृष्णराव कोल्हापुरे हे नामांकित गायक तर होतेच, पण पट्टीचे वीणावादकही होते. ते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्यासमवेत बळवंत संगीत नाटक कंपनीचे भागीदारही होते. वडिलांकडून प्राथमिक धडे गिरवल्यावर पंडित मधुसूदन जोशी आणि खां साहेब अता हुसेन या आग्रा घराण्याच्या ज्येष्ठ गायकांकडून पंढरीनाथांनी तालीम घेतली. कोल्हापुरे कुमार गंधर्वांना गुरुस्थानी मानत. बडोद्यातल्या ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्समध्ये वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर वयाच्या 15 व्या वर्षी ते पहिल्यांदा रेडिओवर गायले. देवधर मास्तरांकडे शिक्षण सुरू झाल्यावर पंढरीनाथांना कुमार भेटले. पं. पंढरीनाथ यांनी तीन पुस्तकेही लिहिली.
पुढे पाहा, शोकसभेत पोहोचलेले कलाकार...