आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मॉम\' चित्रपटात श्रीदेवीचा दिसणार \'नॉन ग्लॅमरस लूक\', पाकिस्तानी अभिनेत्री सजन अली आहे मुलीच्या भूमिकेत..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉम\' हा श्रीदेवीचा 300 वा चित्रपट असणार आहे. - Divya Marathi
मॉम\' हा श्रीदेवीचा 300 वा चित्रपट असणार आहे.
मुंबई - बोनी कपूर निर्मिती चित्रपट 'मॉम' मध्ये श्रीदेवी 'नो मेकअप लूक'मध्ये झळकणार आहे. झी स्टुडिओ यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी,  अक्षय खन्ना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 
 
80 आणि 90 च्या दशकात आपल्या ग्लॅमरस लूकसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री श्रीदेवी 'मॉम' या चित्रपटाद्वारे एक सशक्त भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी तिने 'नो मेकअप लूक' वापरला आहे. 
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीदेवीने जेव्हा या चित्रपटाची कथा ऐकली तेव्हा तिने या भूमिकेवर बराच रिसर्च केला. चित्रपटातील आईच्या भूमिकेची तीव्रता लक्षात घेता श्रीदेवीने चित्रपटासाठी मेकअप न करता शूटिंग करण्याचे ठरवले. ही गोष्ट जेव्हा तिने दिग्दर्शक रवी उद्यवार आणि क्रिएटीव टीमला सांगितली तेव्हा त्यांनीही श्रीदेवीच्या निर्णयाचे कौतुक केले. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, मॉम चित्रपटात असा असणार आहे श्रीदेवीचा लुक तसेच अक्षय खन्ना आणि नवाजुद्दीनही दिसणार मुख्य भूमिकेत 
बातम्या आणखी आहेत...