मुंबई - कमल हसनची मुलगी आणि अभिनेत्री श्रुती हसन गेल्या तीन वर्षापासून मुंबईमध्ये दोन बेडरुमच्या अपार्टमेंटमध्ये राहते. श्रृतीने घराला पिंक रंगाच्या थीमने डेकोरेड केले आहे. तिने अनेक एंटीक गोष्टींनी तिचे घर सजविले आहे. हे घर श्रृतीने तिच्या स्वतःच्या पैशांनी खरेदी केले आहे त्यामुळे ते तिच्यासाठी फार स्पेशल घर असल्याचे ती सांगते. घराच्या कॉर्नरला तिने लाईट्सने सजविले आहे. घराच्या प्रत्येक कॉर्नरवर तिला लाईट्स लावलेले दिसतील.
श्रृतीला पियानो वाजवायला आवडते..
श्रृतीने यूएस मधून म्युझिक ट्रेनिंग घेतली आहे. तिच्या घराच्या पिंक वॉल समोर तिने एक पियानो ठेवला आहे. जेव्हाही तिला वेळ मिळतो ती हा पियानो वाजविते. ड्रॉईंग रुममधील पिंक रंगाचा काऊच तिच्या आवडीचा आहे. यावर बसून ती टीव्ही पाहते, पुस्तक वाचते आणि मीटींगही करते. तिच्या घरातील मेकअप एरीया तिने स्टुडिओप्रमाणे सजविला आहे. एक मोठा मिरर आणि त्यावर पिवळ्या रंगाचे लाईट्स तिने लावलेले आहेत.
पुढच्या स्लाईडवर पाहा, श्रृतीच्या 'पिंक हाऊस'चे हे खास फोटोज्..