मुंबई, बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगला नुकतीच कुख्यात गुंड रवी पुजारीच्या गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पुजारीने अरिजीतकडे 5 कोटींच्या खंडणीची मागणी केली असून पैसे न दिल्यास त्याला जीवे मारण्यात येईल असे त्याला धमकावण्यात आले आहे. अरिजीतला 'आशिकी 2' मधील 'क्योंकी की तुम ही हो...' या गाण्यामुळे प्रसिद्धी मिळाली आहे.
पुजारीला हवे अमेरिकत अरिजीतचे दोन शो
असे म्हटले जाते, की अरिजीत अमेरिकेत एक शो करणार होता. मात्र आयोजकांनी शेवटच्या क्षणी कन्फर्मेशन दिल्याने अरिजीतने त्यांना कार्यक्रमासाठी नकार दिला. याच आयोजकांसोबत शो करण्याचा दबाव आता त्याच्यावर टाकण्यात येतोय.
अरिजीतने काय म्हटले तक्रारीत...
अरिजीतने याप्रकरणी ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. आपल्या तक्रारीत त्याने म्हटले, "एक व्यक्ती सतत माझ्या मॅनेजरला फोन करुन धमकावत आहे. त्यांनी 5 कोटी रुपयांची मागणी केली आहे. हे शक्य नसेल तर रवी पुजारीच्या माणसांसाठी दोन शो मोफत करण्यास सांगितले आहे."
सुरुवातीला अरिजीतने या धमकीकडे दुर्लक्ष केले. मात्र फोन कॉल्स वाढल्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी अद्याप गुन्ह्याची नोंद केलेली नाही.
यापूर्वी शाहरुख-सोनू निगला धमकावले आहे रवी पुजारीने..
यापूर्वी गँगस्टर रवी पुजारीने अनेक बड्या सेलिब्रिटींना धमकावले आहे. पुजारी गँगवर शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर फायरिंग केल्याचा आरोप आहे. शाहरुखच्या एका मित्रावर पुजारी गँगने हल्ला केला होता. त्यानंतर शाहरुखची सुरक्षा वाढवण्यात आली होती.
गायक सोनू निगमनेही रवी पुजारीने धमकावले असल्याचे उघड केले होते. त्याच्या धमकीला कंटाळून सोनूने पार्श्वगायन सोडण्याचाही विचार केला होता.