आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Singer Kailash Kher, Who Just Returned From New York, Has Fallen Sick And Has Been Hospitalised

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गायक कैलाश खेर रुग्णालयात दाखल, प्रकृतीकडे केले होते दुर्लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कैलाश खेर नुकतेच न्यूयॉर्कहून परतले आहेत. 41 वर्षीय कैलाश खेर यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी दिली. ट्विटर आणि फेसबुकवर त्यांनी रुग्णालयातील आपले एक छायाचित्रसुद्धा शेअर केले आहे. प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अॅडमिट झालो. शिवाय आजारपणामुळे गुजरातमधील कॉन्सर्ट रद्द करावा लागल्याचेही त्यांनी सांगितले. कैलाश खेर यांना उद्या डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे.
कैलाश खेर यांनी ट्विट केले, "आरोग्याकडे दुर्लक्ष आणि कामाच्या व्यापामुळे पहिल्यांदाच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झालोय. मुंबईच्या कोलिलाबेन रुग्णालयात आहे. न्यूयॉर्कहून परतल्यानंतर लगेचच आजारी पडलो आणि रुग्णालयात दाखल झालो. पहिल्यांदाच गुजरातच्या भरुचमधील कॉन्सर्ट रद्द करावा लागला."
पुढे वाचा, कैलाश खेर यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट..