आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी गायक मिका सिंगला अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः एप्रिलमध्ये लाइव्ह इव्हेंटमध्ये मिकाने डॉक्टरला थोबाडीत मारली होती.)
नवी दिल्ली : बॉलिवूड गायक मिका सिंग याला अटक करण्यात आली आहे. डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी मिकावर ही कारवाई करण्यात आली आहे. इंद्रपुरी पोलिस स्टेशनने मिका सिंगला अटकेबाबत नोटिस पाठवली होती. यानंतर मिका पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. मात्र अटकेनंतर मिकाला तातडीने जामीन दिला जाणार आहे.
काय आहे प्रकरण?
11 एप्रिल रोजी नवी दिल्लीत मिका सिंगचा एक स्टेज शो होता. हा कार्यक्रम आफ्थॅल्मालॉजी सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अनेक डॉक्टर्सनी हजेरी लावली होती. कार्यक्रमात मिकाने दिल्ली आणि येथील डॉक्टरांचे कौतुक केले. त्याने सर्व पुरुष मंडळींना स्टेजच्या डावीकडे तर स्त्रियांना उजवीकडे जमायला सांगितले. शो सुरु असताना मिकाने अचानक म्युझिक बंद केले. मीकाने आपल्या बाउंसर्सना गर्दीत उपस्थित एका डॉक्टरला स्टेजवर आणायला सांगितले. स्त्रियांच्या गराड्यात जाऊन डान्स करत असल्याचा आरोप या डॉक्टरवर होता. शिवाय तो मिकाकडे मधलं बोट दाखवत अश्लिल हावभाव करत होता. ते बघून मिका चिडला. व्हिडिओत मिका या डॉक्टरला थोबाडीत मारताना दिसतोय. आपल्या आईबहिणींशी तू असाच वागशील का?, हा प्रश्नसुद्धा मिकाने त्या डॉक्टरला केला. त्यानंतर बाउंसर्सच्या मदतीने या डॉक्टरला तेथून बाहेर काढण्यात आले.