आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गायक मीका सिंगविरुद्ध तक्रार, फॅशन डिझाइनरने केला विनयभंगाचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पॉपुलर सिंगिंग रियालिटी शो 'सा रे गा मा पा'चा जज व प्रसिद्ध गायक मीका सिंगविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. एका फॅशन डिझाइनरने मीकावर छेड काढणे व मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

पीडित महिलेने वर्सोवा पोलिस ठाण्यात मीका विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मीकाने आपल्यावर बळजबरी व मारहाण केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. दुसरीकडे, मीकाने महिलेचे आरोप फेटळले आहे. त्याने उलट महिलेविरुद्ध मीकाने तक्रार नोंदवली आहे. महिला बळजबरीने वसुली करत असल्याचा आरोप मीकाने केला आहे.

काय आहे प्रकरण?
- ही घटना मंगळवारी घडली. फॅशन डिझाइनर मीकाच्या घरी आली होती. दोघांमध्ये बाचाबाची झाली. यादरम्यान मीकाने महिलेला धक्काबुक्की केली. इतकेच नाही तर, केस पकडून तिला गोल फिरवले.
- मीका आणि फॅशन डिझायनरमध्ये मागील काही महिन्यांपासून वाद सुरु होता, असे समजते. पोलिसांनी मीकाविरुद्ध तीन तक्रार नोंदवल्या आहेत.

फॅशन डिझाइनरने काय सांगितले?
- फॅशन डिझाइनरने सांगितले की, मीकाला ती मागील पाच वर्षांपासून ओळखते. मीकाने तिला मॉडलिंग असाइनमेंट व सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवले होते. पण त्याने एकही काम दिले नाही.

काय म्हणाला मीका?
- मीकाने फॅशन डिझाइनरने केलेले सर्व आरोप फेटाळले आहे.
- मीकाच्या वकीलांनी सांगितले की, फॅशन डिझाइनर महिलेने मीकाकडे पैशांची डिमांड केली होती. मीकाने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.

पुढील स्लाइडवर वाचा, राखी सावंतला मीकाने केले होते किस...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)


बातम्या आणखी आहेत...