आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंगर-अॅक्ट्रेस श्वेताचे प्री-वेडिंग फोटोशूट, समोर आले मेंदी-हळदीचे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री श्वेता पंडीत गेल्याच महिन्यात तिचा इटॅलियन बॉयफ्रेंड इवानो फुच्चीसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. दोघांनी मुंबईत रजिस्टर्ड मॅरेज केले. लग्नानंतर श्वेताने एक फोटो शेअर करुन लिहिले, "आम्ही कायदेशीररित्या पती-पत्नी झालो आहोत. आता महिन्याभरानंतर जोधपूर आणि मुंबईत सेलिब्रेशन होणारेय." श्वेता आणि फुक्कीने अलीकडेच जोधपूरमध्ये प्री वेडिंग फोटोशूट केले आहे. या प्री वेडिंग फोटोशूट आणि हळदी-मेंदी सेरेमनीची छायाचित्रे समोर आली आहेत .
आता हिंदू पद्धतीने श्वेता-इवानोचे होणार लग्न
इवानो आणि श्वेता आता हिंदू पद्धतीने लग्न करणार आहेत. जोधपूरमध्ये धुमधडाक्यात हे लग्न होणार असून त्याची तयारी सुरु झाली आहे. श्वेताचा नवरा फुक्की बिझनेसमन आहे.

'मोहब्बतें'मध्ये गायली पाच गाणी...
'मोहब्बतें' या सिनेमासाठी ५०० सिंगर्समधून श्वेता पंडीतची निवड झाली होती. त्यावेळी ती १२ वर्षांची होती. सिनेमातील एकुण पाच गाण्यांना श्वेताने स्वरसाज चढवला होता. ही सगळी गाणी मल्टी सिंगर्स आहेत. वयाच्या १६ व्या वर्षी 'मैं जिंदगी हूं' या अल्बमसाठी तिने गाणी गायली. मोहब्बतें या सिनेमासह श्वेताने 'साज', 'दिल क्या करे', 'राजू चाचा' और बाद में 'नई पड़ोसन', 'जूली', 'कभी अलविदा न कहना', 'वेलकम बॅक', 'यमला पगला दीवाना' 'सत्याग्रह', 'हाईवे' आणि 'गुड्डू की गन' या सिनेमांसाठी तिने गाणी गायली आहेत. हिंदीसोबत तामिळ, तेलगू आणि पंजाबीमध्येही श्वेता गाते.

'24'मध्ये केलंय काम..
श्वेता पार्श्वगायनासोबतच अभिनयसुद्धा करते. अनिल कपूरच्या '24' या शोमध्ये अभिनेत्री म्हणून काम केले आहे. शिवाय बिजॉय नाम्बियारच्या डेविडमध्येही ती झळकली आहे. बरखा या सिनेमातही तिने काम केले होते.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, श्वेता-इवानोच्या प्री-वेडिंग फोटोशूट आणि मेंदीची छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...