आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नापूर्वी बेभान होऊन थिरकली बॉलिवूडची ही सिंगर-अॅक्ट्रेस, बघा सेरेमनीचे Inside Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूरः बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री श्वेता पंडीत हिला बुधवारी हळद लागली. प्रसिद्ध अभिनेत्री दिप्ती भटनागर श्वेताच्या लग्नात सहभागी होण्यासाठी खास जोधपूर येथे आली आहे. बुधवारी हळदीनंतर श्वेताच्या हातावर मेंदी रचली. श्वेताचे लग्न इटलीचे प्रसिद्ध बिझनेसमन इवानो फिक्कीसोबत होणारेय.

डान्स करताना दिसली श्वेता...
- जोधपूरमध्ये श्वेता आणि इवानो यांची संगीत सेरेमनी झाली. यासाठी हॉटेलला खास राजस्थानी अंदाजात सजवण्यात आले होते.
- सोशल मीडियावर या संगीत सेरेमनीचा खास व्हिडिओसुद्धा शेअर करण्यात आला आहे.
- व्हिडिओत श्वेता फेटा बांधून अभिनेत्री साशा आगासोबत डान्स करताना दिसत आहे.
- याशिवाय श्वेताचा भावी पती इवानोसुद्धा बँग बँग या गाण्यावर डान्स करताना दिसला.
- या दोघांनी जोधपूरमध्ये प्री वेडिंग फोटोशूटसुद्धा केले आहे.

रजिस्टर्ड पद्धतीने झालंय लग्न...
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्वेता आणि इवानो ब-याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. मुंबईत दोघांनी रजिस्टर्ड मॅरेजसुद्धा केलंय.
- आता हे कपल इटली, जोधपूर आणि मुंबईत थ्री प्लेस डेस्टिनेशन वेडिंग करत आहे.
- श्वेता मुळची जोधपूरची असून येथे तिचे वडिलोपार्जित घर आहे.
'मोहब्बतें'मध्ये गायली पाच गाणी...
'मोहब्बतें' या सिनेमासाठी ५०० सिंगर्समधून श्वेता पंडीतची निवड झाली होती. त्यावेळी ती १२ वर्षांची होती. सिनेमातील एकुण पाच गाण्यांना श्वेताने स्वरसाज चढवला होता. ही सगळी गाणी मल्टी सिंगर्स आहेत. वयाच्या १६ व्या वर्षी 'मैं जिंदगी हूं' या अल्बमसाठी तिने गाणी गायली. मोहब्बतें या सिनेमासह श्वेताने 'साज', 'दिल क्या करे', 'राजू चाचा' और बाद में 'नई पड़ोसन', 'जूली', 'कभी अलविदा न कहना', 'वेलकम बॅक', 'यमला पगला दीवाना' 'सत्याग्रह', 'हाईवे' आणि 'गुड्डू की गन' या सिनेमांसाठी तिने गाणी गायली आहेत. हिंदीसोबत तामिळ, तेलगू आणि पंजाबीमध्येही श्वेता गाते.
'24'मध्ये केलंय काम..
श्वेता पार्श्वगायनासोबतच अभिनयसुद्धा करते. अनिल कपूरच्या '24' या शोमध्ये अभिनेत्री म्हणून काम केले आहे. शिवाय बिजॉय नाम्बियारच्या डेविडमध्येही ती झळकली आहे. बरखा या सिनेमातही तिने काम केले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, श्वेताच्या हळदी आणि संगीत सेरेमनीची खास छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...