आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनीकांत यांच्या जावयपासून ते या अॅक्ट्रेसपर्यंक, लीक झाले साऊथ स्टार्सचे इंटीमेट Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धनुष आणि त्रिशा, दुस-या फोटोत एंड्रियासोबत अनिरुद्ध रविचंदर - Divya Marathi
धनुष आणि त्रिशा, दुस-या फोटोत एंड्रियासोबत अनिरुद्ध रविचंदर
चेन्नई/मुंबई: प्रसिद्ध गायिका आणि TV होस्ट सुचित्रा कार्तिक सध्या चर्चेत आली आहे. तिचे चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले गेलेले खासगी फोटो सध्या व्हायरल होत आहेत. पण हे फोटो सुचित्राचे नाही तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार आणि इतर कलाकारांचे आहे. हे फोटो कलाकारांच्या खासगी पार्ट्यांमधले आहेत. सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई धनुष, हंसिका मोटवानी, अनिरुद्ध रविचंदर, त्रिशा कृष्णन, एंड्रिया, लीलई आणि दिव्यदर्शिनी यांचे हे खासगी फोटो व्हायरल होत आहेत. हे सर्व फोटोज Suchi नावाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट झाले आहेत. याप्रकरणी सुचित्राचे पती कार्तिक कुमार यांच्या मते, तिचे अकाऊंट हॅक झाले आहे.  
 
सुचित्राला जेव्हा तिच्या अकाऊंटवरुन असे काही फोटो शेअर केले गेले आहेत हे कळले तेव्हा तिने लगेच ते फोटो डिलिट केले. शिवाय आपले ट्विटर अकाऊंटची सेटिंग बदलली. शुक्रवारी जेव्हा हे फोटो समोर आले तेव्हा सुचित्राला स्वतःला हा फार मोठा धक्का होता. हे खासगी फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचे कारण काय असेल हे तिलाही कळले नाही.
 
फोटो शेअर केलेल्या प्रकरणाबद्दल बोलताना सुचित्रा म्हणाली, ''माझे अकाऊंट हॅक केले होते. तिच्या मनात कोणाबद्दलही वाईट किंवा द्वेषाची भावना नाहीये. तिने ट्विट करत स्पष्ट केले की, ‘मी कलाकारांसोबत फिरत नाही, माझ्याकडे यांपैकी कोणाचेही फोटो नाहीत, यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे मी स्वार्थी नाही. जी व्यक्ती हे करत आहे त्याला असे वाटत असावे की मी माझे अकाऊंट डिलिट करेन. मी पुढच्या काही सेकंदात हे करु ही शकते. पण मला माहितीये की इथे असेही काही व्यक्ती आहेत जे माझ्यावर मनापासून प्रेम करतात. त्यामुळेच मी माझे अकाऊंट डिलिट करणार नाही. यापेक्षा अजून चांगले काय करता येईल याचा मी विचार करत आहे. पण तरीही मी माझ्या अकाऊंटची सेटिंग बदलत आहे. मी आधीच माझ्या चाहत्यांची माफी मागते.''
 
सुचित्राने लावला होता धनुषवर आरोप.. 
मागील महिन्यात सुचित्रा कार्तिकने तिचे ट्विटर हँडल धनुष आणि त्याच्या आयटी टीमने हॅक केल्याचा आरोप लावला होता. यावेळीसुद्धा कदाचित सुचित्राला तिचे ट्विटर अकाऊंट कोणी हॅक केले हे कळले असावे. म्हणूनच तिने तिच्या पुढच्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘जे फोटो लिक झाले आहेत त्या फोटोंमध्ये स्वतःचा फोटो टाकून त्या हॅकरला असे वाटत आहे की त्याच्यावर संशय येणार नाही.’
 
पुढील स्लाईड्सवर बघा, सुचित्राच्या ट्विटरवर लीक झालेले स्टार्सचे आणखी काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...