आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जानेवारी 2018 मध्ये बाळाला जन्म देणार तुलसी, या अंदाजात केले फोटोशूट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- फेमस सिंगर आणि टी-सीरिज कंपनीचे मालक दिवंगत गुलशन कुमार यांची मुलगी तुलसी कुमार आई होणार आहे. नुकतेच तुलसीने मॅटरनिटी फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये तुलसी बेबीबंप फ्लॉन्ट करताना दिसते. तुलसीने हे फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. यामध्ये तिचा पती हितेश रल्हानही दिसतो. येत्या जानेवारीमध्ये हे कपल आई-बाबा होणार आहे. 

 

2015 मध्ये जयपूरच्या बिझनेसमॅनसोबत झाले शुभमंगल
- तुलसी कुमारचे 22 फेब्रुवारी 2015 ला जयपूरचे बिझनेसमॅन हिदेश रल्हानसोबत लग्न झाले होते. तुलसी कुमार बॉलिवूडची फेमस प्लेबॅक सिंगर आहे. तिने 2006 मध्ये 'चूप चूपके' या फिल्मच्या 'शब-ए-फिराक' गाण्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते.

 

पिंक सिटीसोबत तुलसीचे खास कनेक्शन 
- तुलसीचे पती हितेश जयपूरचे मोठे उद्योगपती आहेत. येथे त्यांचा गारमेंट आणि फर्निचर एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. 
- हितेश आणि तुलसीची भेट एका कॉमन फ्रेंडच्या लग्नात झाली होती. त्यानंतर दोन्ही कुटुंबाच्या संमतीन 2014 मध्ये त्यांनी साखरपुडा केला. 

 

अशी आहे तुलसी कुमारची फॅमिली 
- वडील गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर तिचा भाऊ भूषण कुमारने टी-सीरिज कंपनीची धुरा खांद्यावर घेतली होती. तुलसीने सिंगिंगमध्ये करिअर केले. 
- सध्या टी-सीरिज भारतातील सर्वात मोठी म्यूझिक कंपनी आहे. आता ही 200 मिलियन डॉलरची (जवळपास 1300 कोटी रुपये) कंपनी झाली आहे.
- तुलसी कुमारची बहिण खुशाली कुमार मॉडेल आणि डिझायनर आहे. 
- तुलसीने ती 6 वर्षांची होती तेव्हा सुरेश वाडेकर अॅकेडमीमध्ये गायणाच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. 

 

दिल्लीत झाले शिक्षण 
- तुलसीने तिचे ग्रॅज्यूएशन दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमध्ये पूर्ण केले. 

 

बड्या संगीतकारांसोबत केले काम 
- तुलसी कुमारने हिमेश रेशमिया, प्रीतम, साजिद-वाजिद सारख्या ख्यातनाम संगीतकारांसोबत काम केले आहे. 
- आशिकी 2, सिंघम रिटर्न, एअरलिफ्ट सारख्या चित्रपटांमध्ये तिने गाणे गायले आहे. 

तुलसी कुमारने गायलेले गाणे 
- मोहब्बत की गुजारिश... (अक्सर)
- हमको दीवाना कर गए... (हमको दीवाना कर गए)
- तेरी याद बिछाके सोता हूं... (रॉकी)
- तेरे बिन चैन न आवे... (कर्ज)
- तुम जो आए जिंदगी में बात बन गई... (वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई)
- तू ही रब तू ही दुआ... (डेंजरस इश्क)
- सांसों ने बांधी है डोर पिया... (दबंग-2)
- मेरे यारा तेरे गम अगर पाएंगे... (आशिकी-2)
- मुझे इश्क से... (यारियां)
- कुछ तो हुआ है... (सिंघम रिटर्न)
- तू है कि नहीं... (रॉय)
- सोच ना सके... (एयरलिफ्ट)
- इश्क दी लत तड़पावे... (जुनूनियत)

 

पुढील फोटोमध्ये पाहा, गर्भातील बाळाला म्यूझिक थेरपी देताना तुलसी...

बातम्या आणखी आहेत...