आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखने Reveal केला सलमानच्या 'बजरंगी भाईजान'चा First Look

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शाहरुखने आपल्या ट्विटर अकाउंटवर सलमानच्या आगामी 'बजरंगी भाईजान'चा फस्ट लूक शेअर केला आहे.)
मुंबईः दोन मोठ्या स्टार्सच्या बहुप्रतिक्षित सिनेमांचे फस्ट लूक समोर आले आहेत. अभिनेता सलमान खान स्टारर 'बजरंगी भाईजान'चा फस्ट लूक त्याचा मित्र शाहरुख खानने ट्विटरवर शेअर केला आहे. अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी 'सिंग इज ब्लिंग' या सिनेमाचा फस्ट लूकसुद्धा रिलीज करण्यात आला आहे.
शाहरुखने 'बजरंगी भाईजान'चा फस्ट लूक रिव्हिल करुन लिहिले, "I believe Being a brother is bigger than being a Hero. ‘Bhaijaan’ coming Eid 2015. How do u like the first look?".
फोटोमध्ये सलमानचा चेहरा पूर्ण दिसत नाहीये. त्याने चॉकलेटी रंगाचे स्वेटर घातले आहे. शिवाय गळ्यात लॉकेटच्या रुपात गदा दिसतेय. कबीर खान दिग्दर्शित या सिनेमात सलमानसह करीना कपूर खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यावर्षी ईदच्या मुहूर्तावर सिनेमा रिलीज होणारेय.
आता बोलुयात, अक्षय कुमारच्या 'सिंग इज ब्लिंग'विषयी. सिनेमाच्या पहिल्या पोस्टरवर अक्षय कुमार आणि एमी जॅक्सनची सिझलिंग केमिस्ट्री दिसत आहे. दिग्दर्शक प्रभूदेवाने हे पोस्टर ट्विटरवर पोस्ट केले आहे. बातम्यांनुसार, अक्षय आणि एमीसह यो यो हनी सिंग, बिपाशा बसू, लारा दत्ता आणि विवेक ओबरॉय यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. येत्या 2 ऑक्टोबर रोजी सिनेमा रिलीज होणारेय.
पुढे पाहा, 'सिंग इज ब्लिंग'चा फस्ट लूक...
बातम्या आणखी आहेत...