आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेलमध्ये असताना रक्षाबंधनाच्या दिवशी संजयने दिले होते असे गिफ्ट, इमोशनल झाली होती प्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - संजय दत्त तुरुंगातून सुटला आहे आणि आता त्याचे नॉर्मल लाईफ सुरु झाले आहे. लवकरच संजय दत्त रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. या रक्षाबंधनानिमित्त संजय दत्तसोबत त्याच्या बहिणी प्रिया आणि नम्रता मिळून सेलिब्रेशन करणार आहेत. पण एक वेळ अशी होती की, जेव्हा दोघी बहिणी संजय दत्तला राखी बांधण्यासाठी जेलमध्ये जात असे पण संजय दत्तला त्याच्या बहिणींना गिफ्ट देण्यासाठी काहीच नसे. संजय नेहमीच त्याच्या बहिणींना महागडे गिफ्ट्स देत असे पण त्यासाठी जेलमध्ये असतानाचा काळ फारच खराब होता. पण यावेळी त्याच्या बहिणींना महागडे गिफ्ट नको आहे. काय आहे यामागे कारण सांगतेय प्रिया दत्त...

"मी खूप खूश आहे की मी यावेळी संजयला राखी बांधण्यासाठी त्याच्या घरी जाणार आहे. घरातच एक लहानसे फंक्शनही ठेवण्यात आले आहे. मी आणि नम्रता यावेळी खूप एन्जॉय करणार आहोत". संजयची मुलगी इकरा आणि शाहरानही त्यांच्या चुलत बहीणभावंडांना राखी बांधणार आहे. जेव्हा प्रियाला विचारण्यात आले की यावेळी काय गिफ्ट मिळेल असे वाटते तेव्हा तिने सांगितले, "संजय जेलच्या बाहेर आहे आणि आम्ही सर्वजण त्याला भेटण्यासाठी जाणार आहोत हेच आमच्यासाठी खूप मोठे गिफ्ट असणार आहे." 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, जेव्हा राखीचे गिफ्ट देण्यासाठी बहिणीकडूनच पैसे उधार घ्यायचे संजय दत्त..
बातम्या आणखी आहेत...