आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सिक्स एक्स’च्या ट्रेलरमध्ये बोल्डनेसचा तडका, महिला केंद्रित सिनेमात दिसणार सहा स्टोरीज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एन्टरटेन्मेंट डेस्कः ‘सिक्स एक्स’ या आगामी हिंदी सिनेमाचा ऑफिशिअल ट्रेलर अलीकडेच रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये बोल्डनेसचा तडका पाहायला मिळतोय. सिनेमात अश्मित पटेल आणि सोफिया हयात यांनी एकत्र काम केले असून दोघांवर बरेच किसींग सीन्स चित्रीत करण्यात आले आहेत.
चंद्रकांत सिंह दिग्दर्शित आणि महिला केंद्रित असलेल्या या सिनेमात एकुण सहा वेगवेगळ्या कथांचे चित्रण करण्यात आले आहे. सिनेमात कलाकारांची मोठी फौज बघायला मिळतेय. रितूपर्ण सेनगुप्ता, श्वेता तिवारी, रश्मी देसाई, सोफिया हयात, श्वेता भारद्वाज, हृषिता भट, बदिता बाग, अकिरा, अनुस्मॄती सरकार, जैदी, अश्मित पटेल. राजेश शर्मा, हेमंत पांड्ये आणि आसिफ शेख यांच्या यामध्ये भूमिका आहेत. महिलांचे समाजातील स्थान, त्यांचा सन्मान, त्यांच्या गरजा यावर हा या सिनेमात भाष्य करण्यात आले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या सिनेमाच्या ट्रेलरचा व्हिडिओ आणि सोबतच पाहा छायाचित्रे....
बातम्या आणखी आहेत...