Home »News» Slumdog Millionaire Actress Rubina Ali Searching Job To Survive

9 वर्षांत एवढी बदलली 'स्लमडॉग' ची ही अॅक्ट्रेस, आता खर्च भागवण्यासाठी शोधतेय जॉब

दिव्य मराठी वेब टीम | Sep 14, 2017, 11:13 AM IST

  • स्लमडॉग मिलेनियरमध्ये 'लतिका'च्या भूमिकेतील रुबिना आणि आता अशी दिसते.
मुंबई - स्लमडॉग मिलेनियरमध्ये लतिकाच्या बालपणीची भूमिका करणारी छोटीशी रुबिना अली आता 17 वर्षांची झाली आहे. रुबिना अली आधी वांद्र्यातील झोपडपट्टीमध्ये राहत होती. पण 2011 मध्ये लागलेल्या आगीत त्यांचे घर पूर्णपणे जळाले. त्यामुळे सध्या रुबिना मुंबईपासून 60 किलोमीटर दूर नालासोपारामध्ये एकटीच राहते. रुबिनालाही इतर मुलींप्रमाणेच हिरोईन बनण्याची इच्छा आहे.

सध्या शोधतेय जॉब..
- एका मुलाखतीत रुबिनाने सांगितले होते की, ती खर्च भागवण्यासाठी काहीही जॉब करू शकते. तिच्यासाठी कोणतेही काम लहान किंवा मोठे नाही. रुबिना सध्या कॉलेजमध्ये आहे आणि बीए फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आहे.
- 2011 मध्ये लागलेल्या आगीत रुबिनाचे घर जळाले होते, पण त्याचबरोबर तिच्या 'स्लमडॉग मिलेनियर'शी संबंधित आठवणीही जळून खाक झाल्या होत्या. ऑस्करमध्ये रुबिनाला मिळाले पुरस्कार आणि फोटोही जळून गेले.

पुढील स्लाइड्सवर, वडीलांवर लागले होते रुबिनाला विकल्याचे आरोप...

Next Article

Recommended