आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: अमिताभ यांच्या मेकअपमॅनने केला होता स्मिता पाटीलच्या मृतदेहाचा मेकअप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : स्मिता पाटील
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री स्मिता पाटील आज आपल्यात असती तर 60 वर्षांची झाली असती. 17 ऑक्टोबर 1955ला पुण्यामध्ये जन्मलेल्या स्मिताने 13 डिसेंबर 1986मध्ये चाइल्डबर्थ कॉम्प्लिकेशनमुळे जगाचा निरोप घेतला. 1975मध्ये श्याम बेनेगलच्या 'चरणदास चोर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या स्मिताचे करिअर आणि पर्सनल आयुष्य नेहमी चर्चेत राहिले. तरीदेखील अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या सामान्य लोकांना ठाऊन नाहीये. स्मिताच्या बर्थ अॅनिव्हर्सरीनिमित्त divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे स्मिताच्या पर्सनल मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांच्याशी झालेली बातचीत. यादरम्यान त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक रहस्य शेअर केले आहेत. जाणून घेऊया त्यांच्या स्मिता यांच्या आयुष्याविषयी...
बाथरुममध्ये केला होता पहिला मेकअप-
दीपक सावंत सांगतात, त्यांनी स्मिता यांचा पहिला मेकअप बाथरुममध्ये केला होता. निमित्त होते 1982च्या 'भीगी पलके' सिनेमाच्या शूटिंगचे. या सिनेमाचे सेट कटक, उडीसामध्ये लावण्यात आला होता. यादरम्यान स्मिताने पहिल्यांदा दीपक यांच्याकडून सल्ला घेतला होता, की तिने मेकअप करावा की नाही? कारण वर्षातून 8-8 सिनेमे एकत्र करत असताना ती कधी-कधी मेकअप करत नव्हती. दीपक यांनी सांगितले, 'मी त्यांना म्हणालो तुम्ही आर्ट सिनेमांत मेकअप करत नाही ते ठिक आहे. मात्र हा कमर्शिअल सिनेमा आहे आणि जर तुम्ही मेकअप केला तर चांगल्या दिसाल.' दीपक यांच्या सांगण्यानुसार, सेटवर लाइट कमी असल्याने मेकअप करू शकत नव्हतो, म्हणून आम्ही स्मिताचा मेकअप बाथरुममध्ये केला.
ते सांगतात, 'बाथरुममध्ये एक लाइट सुरु होता, मी स्मिता यांना म्हणाला आपण इथे मेकअप करू शकतो. त्यांनी याला होकार दिला. आम्ही एका बेसिनवर प्लायवूड टाकून त्यावर एक टॉवेल टाकला आणि त्यावर बसून स्मिता यांचा मेकअप केला. त्यानंतर जेव्हा त्या सेटवर आल्या तेव्हा प्रत्येकजण त्यांच्याकडे बघतच राहिला. सर्वांनी त्याची खूप प्रशंसा केली.' दीपक यांनी यादरम्यान सांगितले, की स्मिताने या मेकअपनंतर दीपक यांना पर्सनल मेकअप आर्टिस्ट म्हणून ठेवले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, अमिताभ बच्चन यांना रागावल्या होत्या स्मिता...