आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

18,000 SqFt मध्ये आहे करण जोहरचे नवीन ऑफिस, पहिल्यांदाच बघा Inside Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आतून असे दिसते करण जोहरचे आलिशान ऑफिस - Divya Marathi
आतून असे दिसते करण जोहरचे आलिशान ऑफिस
मुंबईः दिग्दर्शक-निर्माता आणि अभिनेता करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसचे इनसाइड फोटोज व्हायरल झाले आहेत. करण जोहरचे धर्मा प्रॉडक्शनचे ऑफिस याचवर्षी मे महिन्यात अंधेरीस्थित नवीन जागेत शिफ्ट झाले. पूर्वी हे ऑफिस मुंबईतील खार परिसरात होते.

काय आहे नवीन ऑफिसचे वैशिष्ट्य...
करण जोहरच्या या नवीन ऑफिसचे काम नोव्हेंबर 2015 मध्ये सुरु झाले होते. 18,000 Sqft परिसरात असलेल्या या ऑफिसच्या इंटेरिअरला सात महिन्यांचा कालावधी लागला होता. सिमोन दुबाश पंडोले यांनी या ऑफिसरचे इंटेरिअर केले आहे. याचे कॉरिडोर, सिटिंग एरिया, कँटीन, कॅबिनपासून ते रिसेप्शन एरिया अतिशय देखण्या पद्धतीने सजवण्यात आले आहे. ऑफिसच्या भींतींवर धर्मा प्रॉडक्शनच्या सुपरहिट सिनेमांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

1976 मध्ये झाली होती प्रॉडक्शन हाऊसची स्थापना
धर्मा प्रॉडक्शनचा पाया 1976 साली करण जोहरचे वडील आणि प्रसिद्ध निर्माते यश जोहर यांनी रोवला होता. 1980 साली धर्मा प्रॉडक्शनचा रिलीज झालेला पहिला सिनेमा हा 'दोस्ताना' होता. 'अग्निपथ' (1990), 'कुछ कुछ होता है' (1998), 'कभी खुशी कभी गम' (2001), 'माई नेम इज खान' (2010), 'ये जवानी है दीवानी' (2012), 'बार बार देखो' (2016) सह जवळजवळ 35 सिनेमांची निर्मिती धर्मा प्रॉडक्शनने केली आहे. या प्रॉडक्शन हाऊसचा पुढील सिनेमा 'ऐ दिल है मुश्किल' हा येत्या 28 ऑक्टोबर रोजी रिलीज होतोय. करण जोहर दिग्दर्शित या सिनेमात रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन आणि अनुष्का शर्मा लीड रोलमध्ये आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा धर्मा प्रॉडक्शनच्या नवीन ऑफिसचे इनसाइड फोटोज.

फोटो सौजन्य - Architectural Digest

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...