आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मन्नतमध्ये चिमुकल्या अबरामसोबत दिसला शाहरुख, आमिर म्हणाला ईद मुबारक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख आणि त्याच्या चिमुकल्याने चाहत्यांना ईद मुबारक म्हटले. - Divya Marathi
शाहरुख आणि त्याच्या चिमुकल्याने चाहत्यांना ईद मुबारक म्हटले.
मुंबईः ईदच्या निमित्ताने अभिनेता शाहरुख खानने धाकटा मुलगा अबरामसोबत मन्नतच्या बालकनीतून आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. शाहरुख आणि अबराम यावेळी व्हाइट कलरच्या कुर्ता पायजामात दिसले. अबरामला किस करुन शाहरुखने चाहत्यांना ईद मुबारक म्हटले.

यावेळी शाहरखने पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले, ईद कुटुंबासोबत साजरी करत असून आम्ही सगळ्यांनी नमाज अदा केली. बालपणी ईदी म्हणून आजीकडून अकरा रुपये मिळत असल्याचेही त्याने सांगितले.

ईदच्या निमित्ताने कुटुंबीयांना काय गिफ्ट दिले, असे शाहरुखला विचारले असता, तो म्हणाला, आम्ही कुणीही कुणाला काहीच गिफ्ट दिले नाही. मात्र सगळ्यांनी व्हाइट कलरचे कपडे परिधान केले आहेत. सलमान खानचा 'सुल्तान' हा सिनेमा पाहिला का, असे विचारल्यावर त्याने नाही असे उत्तर दिले. सिनेमा बघितल्यानंतर त्यावर बोलणार असेही तो म्हणाला.

आमिर खान आणि सलमान खानने रेसलिंगवर आधारित सिनेमात काम केले, तुझा या विषयावर आधारित सिनेमात काम करण्याचा विचार आहे, का असे विचारल्यावर तो हसून म्हणाला, रेसलिंग माझ्यासाठी अशक्य बाब आहे. इतकेच नाही तर सलमानच्या घरी बिर्यानी खूप टेस्टी असते. वेळ मिळताच त्याच्या घरी जाऊन बिर्यानी चाखणार असल्याचेही शाहरुखन सांगितले.
शाहरुखप्रमाणेच आमिरनेसुद्धा पत्रकारांशी संवाद साधला. आमिरच्या घरी त्याची मुलगी इरा, मुलगा जुनैद, पहिली पत्नी रीना दत्ता, भाचा इमरान आणि त्याची पत्नी अवंतिका ईद साजरी करण्यासाठी पोहोचले आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, शाहरुख-अबराम आणि कुटुंबासोबतची आमिरची छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...