आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूड फोटो शेअर करुन सोफिया हयातने केला #PornBan ला विरोध, 'बिग बॉस'मुळे झाली होती फेमस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोफिया हयातचा फाइल फोटो - Divya Marathi
सोफिया हयातचा फाइल फोटो

मुंबई : बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सोफिया हयातने पॉर्न बॅनच्या निर्णयाला अनोख्या पद्धतीने विरोध केला आहे. ट्विटर, इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन सोफियाने तिचा विरोध दर्शवला आहे. सोफियाचे हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पॉर्न बॅनला विरोध करण्यासाठी सोफियाने एकामागोमाग एक ट्वीट केले आहेत.

एका ट्वीटमध्ये तर सोफियाने सर्व सीमाच ओलांडल्या आहेत. सोफियाने तिचा न्यूड फोटो पोस्ट करुन पॉर्न बॅनविरोधात निषेध नोंदवला आहे. मोदी सरकारवर टीका करणारे कॅप्शनही या फोटोलो दिले आहे. सोफिया इथवरच थांबली नाही तर तिने पॉर्न बॅन काय आहे, असे म्हणत आणखी एक फोटो शेअर केला आहे. ‘पॉर्न प्लीज’ असे लिहिलेल्या ट्रकच्या मागच्या भागाचा हा फोटो आहे.
कोण आहे सोफिया हयात?
ब्रिटीश अभिनेत्री असलेली सोफिया हयात मॉडेलिंग करते. बिग बॉसच्या सातव्या सिजनमध्ये ती दिसली होती. न्यूड फोटोशूटच्या माध्यमातून आपली कारकिर्द निखारण्याचा तिचा प्रयत्न आहे. सोफियाने काही दिवसांपूर्वी रोहित शर्माच्या द्विशतकी खेळीने प्रभावित होऊन तिने आपले न्यूड फोटोशूट थेट रोहितच्या कामगिरीला समर्पित केले होते.
बिग बॉसच्या घरात सोफियामुळे झाली होती अरमान कोहलीला अटक
बिग बॉसच्या सातव्या पर्वात सहभागी झालेल्या सोफिया हयात आणि अरमान कोहली यांच्यात चांगलीच जुंपली होती. हे प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचले होते. अरमानने सोफिया हयातला केलेल्या मारहाणीनंतर त्याला लोणावळा पोलिसांनी अटकही केली होती. या शोमध्ये एखाद्या स्पर्धकाला अटक होण्याची ही पहिलीच घटना होती. शोमधून बाहेर पडल्यानंतर ब्रिटीश मॉडेल सोफिया हयातने अरमानविरोधात मारहाण आणि शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. या तक्रारीनंतर अरमानला अटक झाली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सोफियाने शेअर केलेला स्वतःचा न्यूड फोटो आणि सोबतच वाचा तिने केलेले ट्विट्स...
बातम्या आणखी आहेत...