आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

In Pics : सोहाला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज, तान्हुलीला घेऊन घरी पोहोचले सोहा-कुणाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांच्या घरी 29 सप्टेंबर रोजी तान्हुलीचं आगमन झालंय. सोहा आणि कुणालने आपल्या मुलीचं नाव इनाया नौमी खेमू असं ठेवलं आहे. आज म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी सोहाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सोहा आणि कुणाल आपल्या लेकीला घेऊन घरी पोहोचले आहेत. रुग्णालयातून घरी जातानाचे काही फोटोज समोर आले आहेत. कुणालच्या हातात चिमुकली इनाया दिसतेय.  
 
कुणालने केले होते ट्विट... 
पहिल्यांदाच आई-बाबा झालेले सोहा आणि कुणाल सध्या खूप आनंदात आहेत. 27 सप्टेंबर रोजी सोहाला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आणि त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी तिने मुलीला जन्म दिला. "इनाया खूश आहे आणि तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि आशिर्वादासाठी तिने आभार मानले आहेत," असं ट्विट कुणालनं केलं होतं.  

2015 मध्ये झाले सोहा-कुणालचे लग्न... 
जुलै 2014मध्ये कुणालने पॅरिसमध्ये सोहाला प्रपोज केलं होतं. त्यानंतर जानेवारी 2015 मध्ये दोघांनी लग्न केलं. सोहा गरोदर असल्याची बातमीही कुणालने ट्विटरद्वारे चाहत्यांना दिली होती. डिसेंबर महिन्यात तैमुरचा जन्म आणि आता सोहाने दिलेल्या या गूड न्यूजमुळे खान कुटुंबाचा आनंद द्विगुणीत झाला आहे. तैमुरला आता चिमुकली आतेबहीण मिळाली आहे.  

पाहुयात, घरी निघालेल्या सोहाची खास छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...