आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वॉचमन ते बॉडीगार्डचा प्रवास: सोलापूरचा श्रीशैल बनला अक्षयकुमारचा बॉडीगार्ड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- साधा वॉचमन म्हणून कामाला लागलेल्या सोलापुरातील रामवाडीच्या श्रीशैल टेळे या तरुणाच्या जीवनात अशा काही घडामोडी घडल्या की, ध्यानीमनी नसताना तो आज प्रसिद्ध अभिनेता अक्षयकुमारचा बाॅडीगार्ड बनला आहे. अक्षयच्या मनात श्रीशैलने अढळ स्थानही मिळवले आहे.
लक्षावधी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या गब्बरला (अक्षयकुमार) सोलापूरच्या श्रीने धाडस आणि प्रेमाने जिंकले आहे. आज श्रीशैलशिवाय अक्षयचे पानही हलत नाही. तो त्याचा बाॅडीगार्ड तर आहेच, शिवाय पीए म्हणून त्याची कामे करतो.

सन २००५ मध्ये करिअरसाठी रामवाडीत राहणारा श्री मुंबईत गेला. आई-बाबांचे छत्र हरवलेले. आधार नव्हता. कष्ट करणे हा एकच पर्याय होता. ११ वी पर्यंत शिक्षण. त्यामुळे साधा सिक्युरिटी गार्ड म्हणून तो नोकरी करू लागला. फूट इंच उंच आणि दणकट बांधा चिकाटीने कष्ट करण्याची वृत्ती यामुळे तो प्रमोशन मिळवत गेला. मॉलमध्ये गार्डचे काम करताना एकदा एका शूटिंगच्या प्रॉडक्शन हेडने आमच्यासोबत काम करशील काय, असे विचारले. जेवणाच्या पैसे तरी मिळतील असा विचार करून तो शूटिंगच्या सिक्युरिटीत घुसला. तेथे तो अभिनेता रोनित रॉयच्या कंपनीत स्पेशल गार्ड म्हणून काम करू लागला. आणि अचानक अक्षयकुमारची भेट झाली.
श्रीशैलच्या तोंडून सोलापूरबद्दल सतत ऐकल्याने अक्षयकुमारच्या मनात सोलापूरने घर केले आहे. माय गॉड चित्रपटात कृष्णावतारात तो आपल्या १६ सहस्र पत्नी सोलापूरला असल्याचे सांगतो, तर ग्रामदैवत सिद्धेश्वराचे नाव घेतो. हॉलिडे चित्रपटात त्याने सोलापूरचा उल्लेख केला आहे.
नेहमी शांत असणारा श्री भांडणात मात्र पुढे असतो. लडाखच्या वादात अक्षय, करिना आणि सैफ यांना वाचवून त्याने कौतुक करून घेतले. अक्षयकुमारने श्रीचा सोलापुरी राडा पाहिला, त्यानेच श्रीला अक्षयच्या नजरेत वेगळी ओळख मिळाली.
अशी झाली भेट
टशन चित्रपटाच्या वेळी लडाख येथे अक्षयकुमार, करिना सैफ शूटिंग करत होते. तेथील एका छोट्या हॉटेलात किरकोळ कारणाने वादावादी सुरू झाली. वादाला गंभीर वळण मिळाले. अचानक श्री तेथे गेला. त्याने एकट्याने भांडण थोपवून धरले. अक्षयवरचा वार श्रीने वरच्यावर झेलला. अन्यथा अक्षयच्या नाकावर वार झाला असता. दुसऱ्या दिवशी अक्षयने श्रीला बोलावले. बॉडीगार्ड होशील का, असे विचारले. क्षणाचा विचार करता त्याने होकार दिला. आज वर्षे झाली. तो अक्षयचा बॉडीगार्ड आहे. अक्षय त्याला आपल्या कुटुंबाचा एक भाग समजतो.
तो खूप धाडसी
- श्रीशैलखूप धाडसी आहे. त्याने माझ्यासाठी केलेला त्याग मला खूप महत्त्वाचे वाटते. त्याच्यातला माणूस खूप ग्रेट आहे. तो माझ्यासोबत असणे मला आवडते.
अक्षय कुमार, अभिनेता
आई बाबा हवे होते
- माझे दिवंगत वडील अमृत आणि आई पार्वती यांच्या आशीर्वादाने मी आज सगळे पाहू शकतो आहे. मी खूप कष्ट केले, त्यामुळे आज अक्षयच्या मनात घर करू शकलो. लहानपणापासून चिकाटीने काम करण्याचे वेड होते, तेच कामी आले.
श्रीशैल टेळे
बातम्या आणखी आहेत...