आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'day: तारुण्यात अतिशय हॅण्डसम दिसायचे सलमानचे पापा, अनेक चित्रपटांत केला आहे अभिनय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचे  वडील आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध स्क्रिप्ट आणि डायलॉग रायटर सलीम खान यांचा आज (24 नोव्हेंबर) वाढदिवस असून त्यांनी वयाची 82 वर्षे पूर्ण केली आहेत.  सलीम खान यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1935 रोजी इंदौर येथे झाला. त्यांचे वडील पोलिसांत होते. सलीम खान यांनी जावेद अख्तर यांच्यासोबत मिळून गाजलेल्या 'शोले' या सिनेमाची स्क्रिप्ट लिहिली होती. 


सलमानचे वडील दोनदा अडकले लग्नगाठीत... 
1964 मध्ये सलीम खान यांनी महाराष्ट्रातील ब्राम्हण मुलगी सुशीला चरकसोबत लग्न केले. लग्नाच्या वेळी सुशीला यांनी त्यांचे नाव बदलून सलमा ठेवले.  27 डिसेंबर 1965 रोजी त्यांचा थोरला मुलगा सलमान खानचा जन्म झाला. सलीम आणि सलमा यांची एकुण चार मुले आहेत.  सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान आणि अ‍लविरा ही त्यांची नावे. 1981 मध्ये सलीम खान यांनी प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री हेलेनसोबत दुसरे लग्न केले. हेलन आणि सलीम खान यांचे एकही अपत्य नाही. त्यामुळे त्यांनी एका मुलीला दत्तक घेतले. तिचे नाव आहे अर्पिता खान. अर्पिताचे आता लग्न झाले आहे. 


सलीम खान एक यशस्वी अभिनेते होऊ शले नाहीत, मात्र त्यांच्या मुलांप्रमाणेच तेसुद्धा तारुण्यात खूप हॅण्डसम होते. आज आम्ही तुम्हाला त्यांची तारुण्यातील खास छायाचित्रे दाखवत आहोत.  

 

पुढील स्लाईड्समध्ये वाचा, बॉलिवूडमध्ये हीरो बनण्यासाठी आले होते सलमानचे वडील...

बातम्या आणखी आहेत...