आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या तिशीत सोनाक्षीच्या मेकअप आर्टीस्टला हार्ट अटॅक, झाला मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सोनाक्षी सिन्हाचा मेकअप आर्टिस्ट नीलेश परमारचा मंगळवारी हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला. तो फक्त 30 वर्षांचा होता. सोनाक्षी त्याला प्रेमाना नीलू म्हणत होती. तिने नीलेशचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 'Life wont ever be the same again without this one 💔 r.i.p'. नीलश, सोनाक्षीच्या फार जवळचा होता. सोनाक्षीने तिच्या मित्रांना सांगितले होते, की ती आज या ठिकाणी आहे त्याचे क्रेडिट नीलेशला आहे. 
 
फॅमिली मेंबर होता नीलेश 
- नीलेश, सोनाक्षीचा मेकअप आर्टिस्ट होता, त्यासोबतच तो तिचा फॅमिली मेंबरही होता. 
- 2013 मध्ये गणेश चतुर्थीचा दिवस होता. त्या दिवशी सोनाक्षी शुटिंग करत होती. त्याच दिवशी नीलेशचा बर्थडे होता. मात्र त्याने सुटी घेतली नव्हती. सोनाक्षीला माहित होते की नीलेशचा बर्थडे आहे. तिने सेटवरच नीलेशला सरप्राइज पार्टी दिली, केकही कापला होता. तिने तिची व्हॅनिटी व्हॅन बलुन्सनी सजवली होती. 
 
पहिल्या फिल्मपासून होता सोबत 
- सोनाक्षीचा पहिला चित्रपट 'दबंग' पासून नीलेश तिच्यासोबत होता. इंटस्ट्रीमध्ये मेकअप आर्टिस्टची तशी काही कमी नाही, मात्र सोनाक्षीने नीलेशचीच निवड केली. ती त्याच्याबद्दल म्हणायची की नीलेश नॉन स्टॉप एंटरटेनमेंटचा सोर्स आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नीलेशसोबत सोनाक्षीचे फोटो.. 
बातम्या आणखी आहेत...