आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO+PHOTOS: 28 वर्षांची झाली \'शॉटगन\' यांची लाडकी लेक सोनाक्षी सिन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वडील शत्रुघ्न सिन्हांसोबत सोनाक्षी सिन्हा)
मुंबई - बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आज (2 जून) आपला 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2 जून 1987 रोजी बिहारच्या पटना शहरात अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या घरी सोनाक्षीचा जन्म झाला. ती बी टाऊनच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 'शॉटगन' या नावाने प्रसिद्ध असलेले शत्रुघ्न सिन्हा यांची सोनाक्षी धाकटी मुलगी आहे. सोनाक्षीसह शत्रुघ्न यांना दोन जुळी मुले असून लव आणि कुश ही त्यांची नावे आहेत. सोनाक्षीच्या आईचे नाव पूनम सिन्हा आहे. पूनम सिन्हा यांनी 'जिगरी दोस्त'(1968), 'आदमी और इंसान'(1969), शैतान (1974), ड्रीम गर्ल' (1977) आणि 'जोधा अकबर' (2008) या सिनेमांमध्ये काम केले आहे. सोनाक्षीच्या कुटुंबात यावर्षी एक नवीन सदस्य दाखल झाला आहे. ती व्यक्ती आहे सोनाक्षीची वहिनी आणि तिचा भाऊ कुशची पत्नी तरुणा अग्रवाल.
मुंबईत झाले शिक्षण -
सोनाक्षीचे शालेय शिक्षण मुंबईतील आर्य विद्या मंदिरमध्ये झाले. त्यानंतर तिने श्रीमती नाथीबाई दामोदरदास ठाकरे युनिव्हर्सिटीमधून तिने फॅशन डिझायनिंगचे शिक्षण पू्र्ण केले.
'दबंग'द्वारे झाली बी टाऊनमध्ये एन्ट्री -
बॉलिवूडमध्ये 'दबंग गर्ल' या नावाने प्रसिद्ध असलेल्या सोनाक्षीने 2010 मध्ये 'दबंग' सिनेमाद्वारे बॉलिवू़डमध्ये एन्ट्री घेतली. या सिनेमात सलमान खान तिचा को-स्टार होता. त्यानंतर सोनाक्षीने 'राउडी राठौर', 'सन ऑफ सरदार', 'दबंग -2', 'लुटेरा', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा', 'बुलेट राजा', आणि 'आर राजकुमार' या हिट सिनेमांत अभिनय केला. 'हॉलिडे : अ सोल्जर इस नेवर ऑफ ड्यूटी', 'अॅक्शन जॅक्शन' आणि 'तेवर' हे तिचे अलीकडच्या काळात रिलीज झालेले सिनेमे आहेत. याशिवाय दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्यासह 'लिंगा' या सिनेमातसुद्धा सोनाक्षी झळकली आहे. सध्या ती आगामी 'अकीरा' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.
बालपणापासूनच क्यूट आहे सोनाक्षी -
एकेकाळी लठ्ठपणामुळे हैराण असलेली सोनाक्षी आज बी टाऊनमधील आघाडीची अभिनेत्री आहे. सोनाक्षी बालपणापासूनच क्यूट दिसत होती. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सोनाक्षीच्या बालपणीच्या छायाचित्रांमधून दिसत आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सोनाक्षीची बालपणीपासून ते आत्तापर्यंतची निवडक छायाचित्रे...