आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाक्षी म्हणते, 'बोल्ड कपडे आणि सेक्सचे स्वातंत्र्य म्हणजे महिला सशक्तीकरण नव्हे'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः सोनाक्षी सिन्हा आणि दीपिका पदुकोण)

मुंबई : सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरलेला दीपिका पदुकोणचा 'माय चॉईस' या व्हिडिओला लोकांकडून विरोध होत असल्याचेही दिसून येत आहे. या व्हिडिओखाली आलेल्या साडे तीन हजार प्रतिक्रियांपैकी अधिकाधिक या नापसंती दर्शवणा-या आहेत. या व्हिडिओत महिला अभिव्यक्तीवर दीपिकाने आपले विचार मांडले आहेत. मात्र यातील काही गोष्टींवर लोकांनी आक्षेप नोंदवण्यास सुरूवात केली आहे, आक्षेप नोंदवणाऱ्यांची यादी वाढत चालली आहे, यात सोनाक्षी सिन्हाचा देखील समावेश आहे.
एका इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या सोनाक्षीला जेव्हा दीपिकाच्या 'माय चॉईस' या व्हिडिओवर तुझी काय प्रतिक्रिया आहे? असा प्रश्न विचारला असता, ती म्हणाली, ''मी अद्याप दीपिकाचा हा व्हिडिओ पाहिलेला नाही, पण मला हे माहित आहे हा व्हिडिओ महिला सशक्तीकरणाची विचारधारा मजबूत करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. पण मला म्हणायचे आहे, सशक्तीकरण त्या महिलांचे झाले पाहिजे ज्यांना याची गरज आहे, अशा लोकांच्या सशक्तीकरणाची गरज नाही ज्यांचे पालन पोषण हे सुखी आणि समृद्ध कुटूंबात झाले असेल. महिला सशक्तीकरणाची ही सुरुवात असेल तर हे खूप चांगले आहे, मात्र महिला सशक्तीकरणाचा हा अर्थ नाही की, आपण कशा प्रकारचे कपडे घालावेत आणि कुणाबरोबर शारीरिक संबंध ठेवावेत, महिला सशक्तीकरण म्हणजे महिलांना रोजगार आणि शक्ती देणे होय."
काय आहे दीपिकाच्या या व्हिडिओत
2.34 मिनिटांच्या या व्हिडिओत दीपिका 98 महिलांसोबत स्त्रियांच्या बाजू मांडताना दिसत आहे. दीपिका या व्हिडिओत म्हणते, "मी एक महिला आहे, मला माझ्याशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत. कोणते कपडे मी परिधान करावेत, विवाह करावा, किंवा करू नये, किंवा विवाहाच्या आधी सेक्स करावा किंवा करू नये, हा देखील माझा निर्णय आहे". होमी अदजानिया यांनी हा व्हिडिओ दिग्दर्शित केला आहे.
अनेकांनी दिले समर्थन
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, की अदजानिया यांनी अडीच मिनिटांच्या या व्हिडिओत योग्य मुद्द्याला हात घातला आहे. याशिवाय अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी यांनीदेखील हा व्हिडिओ प्रत्येकाने बघावा, असे म्हटले आहे. अभिनेता अर्जुन कपूरनेसुद्धा या व्हिडिओचे समर्थन केले आहे.
पुढे पाहा, दीपिका पदुकोणचा 'माय चॉईस' हा व्हिडिओ...