आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'एवढ्या उंच, सावळ्या मुलीशी कोण करणार लग्न?\', एकेकाळी सोनमला ऐकावे लागायचे हे टोमणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः ऐश्वर्या असो किंवा प्रियांका, दीपिका असो वा परिणीती, आलिया किंवा सोनम कपूर... बॉलिवूडच्या प्रत्येक अभिनेत्री तिच्या रंगरुप, वजनावरुन क्रिटिसाइज करण्यात आले आहे. अलीकडेच Buzzfeed ला दिले्या मुलाखतीत अभिनेत्री सोनम कपूरने बॉलिवूड शेमिंगच्या मुद्द्यावर चर्चा केली. भूतकाळ आठवताना सोनमने एका फॅमिली फंक्शनमध्ये तिच्या एका नातेवाईकाने तिला मारलेल्या टोमण्यांविषयी सांगितले. सोनमचे रंगरुप बघून नातेवाईकाने "एवढी उंच, एवढ्या सावळी, कोण करेल हिच्याशी लग्न?" असा प्रश्न तिच्या आईवडिलांना केला होता. सोनमने सांगितले स्लीपलेस नाइट्सविषयी...

सोनमने सांगितले, "अनेक तरुणींप्रमाणे मीसुद्धा आरशात स्वतःला बघत बेडरुममध्ये अनेक रात्री जागून काढल्या आहेत. इतकेच नाही तर माझे शरीर असे का? असा प्रश्नही मला पडायचा. माझे पोट सुटले होते, माझे दंड खूप जाड होते, मी गोरी का नाही, माझ्या डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळं, वयापेक्षा मी मोठी का दिसते, माझे स्ट्रेच मार्क कधी जातील का? असे एक ना अनेक प्रश्न मला सतावत असायचे."
जेव्हा ऐश्वर्याला बघतच राहिली होती सोनम...
सोनमने सांगितले, 13 वर्षांची असताना ती आपल्या फॅमिलीसोबत गोव्यात गेली होती. त्याचवेळी ऐश्वर्या राय आपल्या मित्रांसोबत गोव्यात आली होती. सोनम सांगते, "मला आठवतंय, ब्लू जीन्स आणि व्हाइट टॉपमध्ये ऐश्वर्या रॉयल दिसत होती. तिला बघताच मी तिच्यावर फिदा झाले होते."

पुढे वाचा, मुलाखतीत सोनमने आणखी काय काय सांगितले...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...