आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

National Award सोहळ्यात तथाकथित बॉयफ्रेंडसोबत दिसली सोनम, असा व्यक्त झाला \'आनंद\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूरला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 'नीरजा' या सिनेमातील अप्रतिम अभिनयासाठी तिला विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला. बुधवारी दिल्लीत विज्ञान भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सोनमचा गौरव झाला. ट्रेडिशनल लूकमध्ये सोनम अतिशय सुंदर दिसली. या सोहळ्यात सोनमचे कौतुक करण्यासाठी तिचे आईवडील म्हणजेच अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांनी हजेरी लावली होती. पण या दोघांसोबतच सोनमच्या आयुष्यातील आणखी एक खास व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित होती. आम्ही बोलतोय ते सोनमचा तथाकथित बॉयफ्रेंड आनंद आहुजाविषयी. सोनम राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर गेल्यानंतर अनिल कपूर आणि आनंद यांनी टाळ्या वाजवत तिचे कौतुक केले. शिवाय सोहळ्यानंतर अनिल कपूर आणि सोनमसोबत आनंद बराच वेळ एकत्र घालवताना दिसला. या सोहळ्यातील आनंदसोबतचे सोनमचे काही फोटोज सध्या व्हायरल होत आहेत. खरं तर सोनम आणि आनंद यांनी अद्याप आपल्या नात्याची अधिकृतरित्या कबुली दिलेली नाही. पण आता लवकरच दोघे त्यांच्या नात्याची कबुली देतील, अशा चर्चांना उधाण आले आहे.     

अशी झाली सोनम कपूर–आनंद अहुजाची भेट
गेल्या कित्येक दिवसांपासून या लव्ह बर्डची प्रेमकहाणी चर्चेत आहे. या दोघांची ओळख दिल्लीत एका पार्टीमध्ये झाली होती. त्यानंतर हे दोघे अनेक ठिकाणी एकत्र वेळ घालवताना दिसले. आनंद आहुजा हा मुळचा दिल्लीचा असून फॅशन इंडस्ट्रीत कार्यरत आहे.   

पुढे बघा, राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील आनंद आहुजा आणि सोनम कपूरचे खास फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...