आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबापासून वेगळी राहणार सोनम कपूर, 30 कोटींत खरेदी केला नवीन डुप्लेक्स!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(याच बिल्डिंगमध्ये सोनम कपूरने अपार्टमेंट खरेदी केले आहे.)
मुंबईः प्रियांका चोप्रा, श्रद्धा कपूर, सोनम कपूर आणि आलिया भट्ट या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री नवीन घराच्या शोधात असल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमधून आली होती. सोनम कपूर या मिशनमध्ये यशस्वी ठरली आहे. बातम्यांनुसार, सोनमने वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केले आहे. तिचे हे नवीन घर तिस-या आणि चौथ्या फ्लोअरवर आहे. लवकरच सोनम वडील अनिल कपूरचे घर सोडून आपल्या नवीन घरात गृहप्रवेश करणारेय.
7000 स्वे. फुटमध्ये आहे अपार्टमेंट, किंमत 30 कोटी रुपये
30 कोटी किंमत असलेले हे अपार्टमेंट सात हजार स्वे. फुटमध्ये पसरलेले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून सोनम नवीन घराच्या शोधात होती, तिला बीकेसीमधील प्रोजेक्टची माहिती मिळताच, तिने तेथे अपार्टमेंट बुक करण्याचा निर्णय घेतला. या बिल्डिंगचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे एक मिनी थिएटरसुद्धा आहे. येथे सोनम आपल्या सिनेमांचे स्क्रिनिंग आयोजित करु शकते.
सध्या घराच्या इंटेरियरमध्ये बिझी आहे सोनम
सोनम कपूरने महिन्याभरापूर्वी या घराची डील फायनल केली आहे. सध्या ती तिची मावशी कविता सिंह यांच्यासोबत मिळून घराचे सुशोभिकरण करत आहे. घराचे रजिस्ट्रेशन गेल्या आठवड्यात झाले आहे. या घरात शिफ्ट होण्यासाठी सोनमला वर्षभराचा कालावधी लागला आहे.
बिझनेसमन्स आहेत शेजारी
सोनमने ज्या बिल्डिंगमध्ये आपले अपार्टमेंट बुक केले आहे, त्यामध्ये गौतम अडानी, सिटीग्रुपचे फॉर्मर हेड विक्रम पंडीत, इरोज इंटरनॅशनलचे हेड किशोर लुल्ला आणि सिटी इंडियाचे सीईओ प्रमित झावेरी हे दिग्गज वास्तव्याला आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सोनमच्या नवीन आशियानाचे काही सँपल फोटोज...